Samsung Galaxy XCover7 Pro: सॅमसंगने अखेर आपला नवा रग्ड स्मार्टफोन Galaxy XCover7 Pro जागतिक स्तरावर लॉन्च केला आहे. नावावरूनच कळते की हा एक रग्ड फोन असून, खडतर परिस्थितीत वापरता यावा यासाठी खास डिझाइन करण्यात आला आहे.
यावर धूळ, माती आणि पाण्याचा काहीही परिणाम होत नाही. याचे शरीर इतके मजबूत आहे की अचानक हातातून खाली पडले तरी सहजपणे तुटणार नाही. या नवीन फोनमध्ये Corning Gorilla Glass Victus+ प्रोटेक्शनसह 6.6-इंचाचा Full HD+ 120Hz LCD डिस्प्ले दिला आहे. पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये Snapdragon 7s Gen 3 4nm मोबाइल प्लॅटफॉर्म वापरण्यात आला आहे.
पाण्याचा परिणाम नाही, पडल्यावरही सुरक्षित
धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी या फोनला IP68 रेटिंग मिळाली असून, टिकाऊपणासाठी MIL-STD-810H6 सर्टिफिकेशन देण्यात आले आहे, जे पडणे, उच्च तापमान आणि कंपने यांना सहन करण्याची क्षमता देते.
यात Anti-feedback Noise Reduction फीचर आहे, जे एका चॅनलवर अनेक डिव्हाइस एकत्र असताना होणारा डिस्टर्बिंग साउंड कमी करते. दमदार आवाजासाठी यामध्ये Stereo स्पीकर्स दिले आहेत. फोनमध्ये 4350mAh ची Replaceable Battery असून, USB चार्जिंग व्यतिरिक्त POGO चार्जिंग इंटरफेस देखील आहे.
मोठा डिस्प्ले आणि दमदार RAM
या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.6 इंचाचा Full HD+ LCD Display देण्यात आला आहे. हा डिस्प्ले Wet Touch आणि Gloves Mode ला सपोर्ट करतो, म्हणजे ओले हात किंवा हातमोजे घालूनसुद्धा सहज वापरता येतो. फोनमध्ये 6GB RAM आणि 128GB Storage आहे.
कंपनीनुसार, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 2TB पर्यंत वाढवता येते. हा फोन Android 15 वर आधारित Samsung OneUI 7 वर चालतो.
फ्रंट आणि रियर कॅमेरे दोन्ही दमदार
फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 8MP Ultra-Wide कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यामध्ये 13MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनचे वजन 240 ग्रॅम आहे. कनेक्टिविटीसाठी यामध्ये 5G, Dual 4G, Wi-Fi 6E, Bluetooth 5.4, GPS, आणि USB Type-C पोर्ट यांसारखे पर्याय देण्यात आले आहेत.
किंमत आणि उपलब्धता
Samsung Galaxy XCover7 Pro ची किंमत युरोपमध्ये 609 Euro (USD 689 / सुमारे ₹59,290) ठेवण्यात आली आहे आणि 28 एप्रिल 2025 पासून निवडक युरोपियन बाजारात उपलब्ध होईल. हा फोन 8 मे 2025 पासून अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध असेल.