Infinix कंपनीने गेल्या आठवड्यात जाहीर केलं होतं की, ती भारतात 18 एप्रिल रोजी Infinix Note 50s 5G+ हा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या फोनमध्ये Scent-Tech नावाचं खास फीचर मिळणार आहे, ज्यामुळे मोबाइलमधून सुगंध येईल.
आता या फोनच्या लॉन्चपूर्वीच कंपनीने इनफिनिक्स नोट 50एस 5जी प्लस (Infinix Note 50s 5G+) चे संपूर्ण स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सही उघड केले आहेत. या नवीन 5G फोनमध्ये काय खास आहे, हे आपण पुढे जाणून घेऊ.
Infinix Note 50s 5G+ भारतात केव्हा होतोय लॉन्च?
या फोनचा अधिकृत लॉन्च 18 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता होणार असून, त्याची किंमत आणि विक्रीबाबतची माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर Live Streaming द्वारे शेअर केली जाईल.
Note 50s 5G+ हा स्मार्टफोन तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होईल – Titanium Grey (Metallic Finish), Ruby Red (Metallic Finish) आणि Marine Drift Blue (Vegan Leather, Scent-Tech).
Infinix Note 50s 5G+ स्पेसिफिकेशन्स
परफॉर्मन्स: हा नवा 5G स्मार्टफोन (5G Smartphone) Android 15 वर आधारित असून, त्यावर XOS 15 ची सॉफ्टवेअर स्किन असेल. प्रोसेसिंगसाठी यामध्ये MediaTek Dimensity 7300 Ultimate ऑक्टा-कोर चिपसेट दिला आहे, जो 4nm fabrication वर तयार करण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा फोन 700K+ AnTuTu score प्राप्त करू शकतो आणि यात 90fps gaming करता येते.
बॅटरी: फोनमध्ये 5500mAh बॅटरी देण्यात आली असून, ती 45W All-Round FastCharge 3.0 तंत्रज्ञानासह येते. त्यामुळे मोठी बॅटरी लवकर चार्ज करता येणार आहे.
कॅमेरा: फोटोग्राफीसाठी यामध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 64MP Sony IMX682 सेन्सर दिला आहे, जो 10x डिजिटल झूम आणि AI Halo Timer सपोर्ट करतो. यासोबत ड्युअल LED फ्लॅश सुद्धा मिळतो. सेल्फीसाठी पुढील बाजूला 13MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
डिस्प्ले: या फोनमध्ये 6.78-इंच FullHD+ AMOLED कर्व्हड डिस्प्ले मिळतो, जो 144Hz Refresh Rate ला सपोर्ट करतो. स्क्रिनवर पंच-होल डिझाइन, In-display Fingerprint Sensor टेक्नॉलॉजी आणि Corning Gorilla Glass 5 Protection दिली आहे.
इतर फीचर्स: हा स्मार्टफोन MIL-STD 810H Military Grade Durability सह येतो. तसेच याला IP64 Rating मिळाली आहे, त्यामुळे तो पाणी आणि धूळ प्रतिरोधक (Water and Dust Resistant) आहे. यामध्ये IR Blaster, Active Halo Lighting आणि AI आधारित कॅमेरा फिचर्स मिळतात.