Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने बदल होत आहेत. सोने एक दिवस स्वस्त आणि दुसऱ्या दिवशी महाग होतंय. आज म्हणजेच शुक्रवारीही सोन्याच्या दरात घसरण दिसून आली.
वीकेंडपूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाल्याने लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद पसरला आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदी करण्यापूर्वी एकदा किंमत जाणून घ्या.
सोन्याचा आजचा भाव
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 57,650 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,880 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवली गेली.
मुंबईत सोन्याचा भाव किती?
मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 57,500 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,730 रुपये आहे.
चेन्नईमध्ये आज सोन्याचा भाव:
चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 57,950 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 63,220 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, आज म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी 995 शुद्धतेच्या सोन्याचा दर 61779 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला जात आहे. त्याचवेळी 916 (22 कॅरेट) शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज 56817 रुपये प्रति 10 ग्रॅमवर घसरला आहे.
बहुतेक लोक दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. 750 (18 कॅरेट) शुद्धता असलेल्या सोन्याची किंमत आज 46520 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याच वेळी, 585 (14 कॅरेट) शुद्धतेच्या सोन्याची किंमत 36286 रुपये प्रति 10 ग्रॅमवर घसरली आहे.
सोन्याचे भाव कधी वाढतील याबाबत काहीच सांगता येत नाही, त्यामुळे लवकर खरेदी करा.