Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने बदल होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर पाहिल्यानंतर लोकांची डोकेदुखी सुरु झाली आहे. सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.
भारतीय सराफा बाजारात आज, 26 एप्रिल 2024 रोजी सकाळी पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. आता सोन्याने 72 हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर त्याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलो 81 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याची किंमत 72360 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 81456 रुपये प्रति किलो आहे. चला तर मग सांगूया आज तुमच्या शहरात सोन्या-चांदीचा भाव किती आहे?
आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे?
ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, आज 995 शुद्धतेच्या सोन्याचा दर 72070 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याच वेळी, 916 (22 कॅरेट) शुद्धता असलेल्या सोन्याची किंमत 66282 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेंड करताना दिसत आहे. तर, 750 (18 कॅरेट) शुद्धता असलेल्या सोन्याची किंमत 54270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. शेवटी, 585 (14 कॅरेट) शुद्धता असलेल्या सोन्याचा दर 42331 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज म्हणजेच 26 एप्रिल 2024 रोजी चांदीची किंमत 81456 रुपये प्रति किलो आहे.
दिल्लीत सोन्याचा भाव किती आहे?
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 66,800 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 72,860 रुपये आहे.
मुंबईत आज सोन्याचा भाव किती?
मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 66,650 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 72,710 रुपये आहे.