Gold Price Today: सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर आज म्हणजेच १३ मार्च रोजी किंचित घट नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात बुधवारी सोन्याचा भाव २३२ रुपयांनी घसरून ६५,३३४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला.
सोन्याच्या दरात झालेली घसरण पाहून नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, तरीही सोन्याचा दर 65 हजार रुपयांच्या पुढे होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी आली होती, त्यामुळे बाजारात खळबळ उडाली होती.
आज बुधवारी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळाली. जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी तुम्हाला तुमच्या शहरातील सोन्याचे दर जाणून घेणे आवश्यक आहे.
सोन्याची किंमत काय आहे
इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, आज म्हणजेच 13 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,334 रुपये प्रति ग्रॅम झाला आहे. तर, काल सकाळी सोन्याचा दर 65,616 रुपये होता आणि संध्याकाळी तो 65566 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला.
995 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 65072 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी नोंदवण्यात आली आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 59846 रुपये आहे, तर काल संध्याकाळपर्यंत तो 60059 रुपये होता आणि काल सकाळी 60103 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता.
18 कॅरेट सोन्याचा दर 49,001 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे, तर 14 कॅरेट सोन्याचा दर 38,220 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे, तर काल सकाळपर्यंत सोन्याचा दर 38,384 रुपये प्रति 10 ग्रॅमवर विकला जात होता. तर, आज चांदीचा भाव 72149 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
मुंबईत आज सोन्याचा भाव
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 6073 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 6625 रुपये प्रति ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे.
कोलकात्यात सोन्याचा दर किती आहे
आज कोलकात्यात, 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 6073 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 6625 प्रति ग्रॅमवर ट्रेंड करताना दिसत आहे.
चेन्नईत आज सोन्याचा भाव किती आहे?
चेन्नईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 6148 प्रति ग्रॅम नोंदवली जात आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 6708 प्रति ग्रॅम नोंदवली जात आहे.
दिल्लीत आज सोन्याचा भाव
राजधानी दिल्लीत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6088 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 6640 रुपये प्रति ग्रॅम आहे.