Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात दररोज चढ-उतार होत आहेत. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड चढ-उतार होत आहेत.
पहिल्या आठवड्यात 61,700 रुपयांवर पोहोचलेल्या सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांत घसरण झाली होती.आता पुन्हा एकदा त्यात वाढ होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे चांदीचा दरही 77,000 रुपयांच्या पुढे गेला आहे.
त्यानंतर तो 68,000 रुपयांपर्यंत घसरला मात्र आता पुन्हा 75,000 रुपयांचा टप्पा पार केला आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी तेजीसह बंद झालेल्या सराफा बाजारात आज संमिश्र कल दिसून आला.
MCX वर दोन्ही धातूंचे दर घसरले
आठवड्याच्या पहिल्या दिवशी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. सोन्याचा भाव 160 रुपयांनी घसरून 59156 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा भाव 268 रुपयांनी घसरून 75700 रुपये किलो झाला.
एमसीएक्सवर सोने 59316 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 75968 रुपये प्रति किलोवर बंद झाली. सराफा बाजाराच्या https://ibjarates.com या वेबसाइटवर दररोज नवीनतम दर जाहीर केले जातात .
वेबसाइटने जारी केलेल्या दरानुसार, 24 कॅरेट सोने 59265 रुपये प्रति 10 ग्रॅमवर घसरले. त्याचप्रमाणे चांदीचा भाव 75115 रुपये प्रतिकिलो झाला.
सोने 59338 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 74979 रुपये प्रति किलोवर बंद झाली. 23 कॅरेट सोन्याचा दर 59028 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचा दर 54287 रुपये प्रति 10 ग्रॅम, 20 कॅरेट सोन्याचा दर 44449 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.