Tomato Market: टोमॅटो बाजारात घसरण; जाणून घ्या कुठे किती बाजारभाव मिळाला

टोमॅटोच्या बाजारभावात घट; पुणे बाजारात दर २२०० रुपये प्रती क्विंटल तर सोलापूर बाजारात सर्वात कमी १७०० रुपये. मुंबईत सर्वाधिक दर ३६४० रुपये. जाणून घ्या राज्यातील निवडक बाजारातील साप्ताहिक भाव.

On:

पुणे : राज्यातील टोमॅटो बाजारभावात या आठवड्यात लक्षणीय घट झाली आहे. पुणे बाजारात टोमॅटोचा सरासरी दर २२०० रुपये प्रती क्विंटल इतका नोंदवण्यात आला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत हे भाव तब्बल १६ टक्क्यांनी कमी झाले आहेत.

देशपातळीवरील आवक घटली

देशभरातील प्रमुख बाजारपेठेत मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या आवक मध्ये १७.८ टक्केनी घट झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुरवठा कमी झाल्याचे दिसून येत आहे.

प्रमुख बाजारातील भाव

  • मुंबई : सर्वाधिक दर ३६४० रुपये/क्विंटल
  • पुणे : सरासरी दर २२०० रुपये/क्विंटल
  • सोलापूर : सर्वात कमी दर १७०० रुपये/क्विंटल
  • नारायणगाव : सुमारे ३,००० रुपये/क्विंटल
  • संगमनेर : सरासरी दर २२०८ रुपये/क्विंटल

स्थानिक बाजारातील कॅरेट भाव

पिंपळगाव बाजारात टोमॅटोचा दर प्रति कॅरेट किमान १२१ रुपये तर सरासरी ८५१ रुपये इतका होता.
लासलगाव बाजारात मात्र किमान ५० रुपये तर सरासरी ८६१ रुपये दर मिळाला.

साप्ताहिक अहवाल

ही आकडेवारी मा. बाळासाहेब ठाकरे कृषीव्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) यांच्या साप्ताहिक किंमत सनियंत्रण अहवालावर आधारित आहे.

Follow Us
Join Our WhatsApp Channel