ऑगस्ट महिन्याची सुरुवात ग्राहकांसाठी आनंदाची ठरली आहे. 1 ऑगस्टपासून एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे. याचबरोबर सोनं-चांदीच्या दरातही घट नोंदली गेली असून दागदागिने खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी हा दिवस चांगला मानला जात आहे.
सोनं-चांदी स्वस्त झालं, गुंतवणूकदारांना दिलासा
शुक्रवारी 10 ग्रॅम सोनं कालच्या तुलनेत 580 रुपयांनी स्वस्त झालं आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव सध्या 1,00,000 रुपयांच्या आसपास आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 91,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीबाबत बोलायचं झालं तर दरात तब्बल 3,000 रुपयांची घट झाली असून 1 किलो चांदीचा भाव 1,14,900 रुपयांवर पोहोचला आहे.
सोन्याच्या दरात घसरण का झाली?
दिल्ली सराफा बाजारात काल संध्याकाळी सोन्याच्या भावात 500 रुपयांची घसरण झाली होती. यामागचं प्रमुख कारण म्हणजे रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत होणं. गुरुवारी रुपया 22 पैशांनी वाढून 87.58 वर पोहोचला. यामुळे आयात होणाऱ्या वस्तू स्वस्त झाल्या आणि त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर दिसला.
आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोन्याच्या भावावर दबाव कायम आहे. HDFC सिक्युरिटीजचे विश्लेषक सौमिल गांधी यांच्या मते, अमेरिकेच्या GDP आकडेवारीनंतर डॉलर मजबूत झाला. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडून वळून रिस्क असलेल्या शेअर मार्केटसारख्या पर्यायांकडे वळले आहेत. यामुळे सोन्याच्या बाजारात विक्रीचं वातावरण तयार झालं.
आज 1 ऑगस्ट 2025 रोजीचे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर
शहर | 22 कॅरेट दर (₹/10 ग्रॅम) | 24 कॅरेट दर (₹/10 ग्रॅम) |
---|---|---|
दिल्ली | 91,840 | 1,00,170 |
चेन्नई | 91,690 | 1,00,020 |
मुंबई | 91,690 | 1,00,020 |
कोलकाता | 91,690 | 1,00,020 |
जयपूर | 91,840 | 1,00,170 |
नोएडा | 91,840 | 1,00,170 |
गाझियाबाद | 91,840 | 1,00,170 |
लखनौ | 91,840 | 1,00,170 |
बंगळुरू | 91,690 | 1,00,020 |
पटना | 91,690 | 1,00,020 |
भारतामध्ये सोन्याचे दर कसे ठरतात?
- आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे भाव
- आयात शुल्क आणि कर प्रणाली
- रुपया-डॉलर यांच्यातील विनिमय दर
- डिमांड आणि सप्लायचा समतोल
भारतामध्ये सोन्याला फक्त गुंतवणूक म्हणून नव्हे तर परंपरेचा भाग मानलं जातं. लग्नसमारंभ, सण-उत्सव यामध्ये सोनं खरेदी केलं जातं. त्यामुळे दरातील बदलाचा थेट परिणाम प्रत्येक कुटुंबावर होतो.