Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने बदल होत आहेत. सोने-चांदी कधी स्वस्त तर कधी महाग होताना दिसते. पूर्वी सोन्याच्या किमतीत वाढ होत होती, तर आज म्हणजेच १८ फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरात थोडीशी घसरण नोंदवली गेली आहे.
सोन्याच्या दरात झालेली घसरण पाहून महिलांचे चेहरे उजळले. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आता एक चांगली संधी आहे, कारण सोन्याची किंमत कधी वाढेल हे कोणालाच माहीत नाही.
18 फेब्रुवारी 2024 रोजी 10 ग्रॅमचा सरासरी दर सुमारे 62,400 रुपये होता. 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची सरासरी किंमत
सुमारे 62,400 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची हीच किंमत 57,200 रुपये नोंदवली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया विविध शहरांमध्ये सोन्याचे भाव काय आहेत:-
दिल्लीत सोन्याचा भाव किती आहे?
राजधानी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 57,350 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,550 रुपये इतकी नोंदवण्यात आली आहे.
मुंबईत आज सोन्याचा भाव
मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 57,200 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.