Farmer Schemes: सरकार शेतकऱ्यांना देणार दरमहा ₹3000 पेन्शन, कोण पात्र आणि कसा मिळेल लाभ?

PM Kisan Maandhan Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना 60 वर्षांनंतर दरमहा ₹3000 पेन्शन मिळणार. प्रीमियम किती, पात्रता काय, कोण अपात्र? संपूर्ण माहिती येथे वाचा.

Manoj Sharma
PM Kisan Maandhan Yojana
PM Kisan Maandhan Yojana

केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM Kisan Maandhan Yojana) ही शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली निश्चित पेन्शन योजना आहे. नोकरी करणाऱ्या लोकांप्रमाणे शेतकरी नेहमी निवृत्तीची बचत करू शकत नाहीत, हीच पोकळी भरून काढण्यासाठी सरकारने ही योजना जाहीर केली. वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा ₹3000 पेन्शन मिळणे हे तिचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

- Advertisement -

योजनेचे उद्दिष्ट

केंद्र सरकारने ही योजना लहान, सीमांत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठी आणली आहे. वृद्धापकाळात शेतकऱ्यांच्या हातात स्थिर उत्पन्न असावे, त्यांच्या रोजच्या खर्चात अडचण येऊ नये आणि ते सन्मानाने जीवन जगावे, हा या योजनेचा हेतू आहे.

नोंदणी कशी करावी?

शेतकऱ्यांनी जवळच्या CSC (Common Service Centre) मध्ये जाऊन नोंदणी करावी. नोंदणीनंतर शेतकऱ्यांनी त्यांच्या वयानुसार ₹55 ते ₹200 पर्यंतचा मासिक प्रीमियम भरावा लागतो. वयाच्या 60 व्या वर्षी पोहोचल्यावर सरकारकडून दरमहा पेन्शन जमा केली जाते.

- Advertisement -

योजनेची मुख्य वैशिष्ट्ये

  • 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांसाठी ही ऐच्छिक पेन्शन योजना.
  • अल्प व सीमांत भूधारक शेतकरी पात्र.
  • 60 वर्षांनंतर दरमहा ₹3000 निश्चित पेन्शन.
  • शेतकरी जितका भरतो तितकाच matching contribution केंद्र सरकारकडून जमा केला जातो.
  • नोंदणीकृत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, पत्नीला दरमहा ₹1500 पेन्शन.

कोण ठरतील अपात्र?

खालील श्रेणीतील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही:

- Advertisement -
  • EPFO, ESIC किंवा इतर सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभार्थी.
  • प्रधानमंत्री श्रम योगी मानधन किंवा व्यापार मानधन योजनेचे लाभार्थी.
  • उच्च आर्थिक स्थितीतील शेतकरी, जमीनधारक संस्था.
  • खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष.
  • केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी (कार्यरत/निवृत्त).
  • Income Tax भरलेले व्यक्ती.
  • नोंदणीकृत वकील, डॉक्टर, अभियंते इ.

आवश्यक कागदपत्रे

  • सातबारा / 8A उतारा.
  • आधार लिंक बँक खाते.
  • मोबाइल क्रमांक.
  • आधारकार्डवरील जन्मतारीख.

शेतकरी ही सर्व कागदपत्रे घेऊन CSC केंद्रात जाऊन सहज ऑनलाइन नोंदणी करू शकतात.

पेन्शन कधी मिळते?

शेतकरी जितक्या कमी वयात नोंदणी करेल, तितका मासिक प्रीमियम कमी लागतो. इच्छा असल्यास, शेतकरी PM Kisan Saman Nidhi मधून मिळणारी रक्कमही प्रीमियम भरण्यासाठी वापरू शकतो. वयाच्या 60 वर्षांनंतर शेतकऱ्याला दरमहा ₹3000 पेन्शन दिली जाते.

Follow:
मनोज शर्मा हे MarathiGold.com साठी व्यवसाय, गोल्ड प्राईज, सरकारी योजना, बँकिंग आणि पोस्ट ऑफिस योजनांवर लेखन करणारे कंटेंट लेखक आहेत. ते अधिकृत आणि विश्वासार्ह स्त्रोतांच्या आधारे फायनान्सविषयक माहिती सादर करतात.