Realme ने आपल्या लोकप्रिय Narzo सिरीजमधील Narzo 80 Pro 5G या स्मार्टफोनचा नवीन कलर व्हेरिएंट आज भारतात लाँच केला आहे. मिड-रेंज वापरकर्त्यांना लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला हा स्मार्टफोन आता आकर्षक Nitro Orange रंगात सादर करण्यात आला आहे.
हा फोन खासकरून गेमिंग आणि हाय परफॉर्मन्स वापरकर्त्यांसाठी डिझाइन करण्यात आला आहे. यामध्ये मिलिटरी ग्रेड प्रोटेक्शन मिळते, ज्यामुळे फोन सहजपणे धूळ, शॉक, व्हायब्रेशन, प्रेशर आणि अत्यंत तापमानासारख्या गोष्टींना तोंड देऊ शकतो.
Realme Narzo 80 Pro च्या नवीन कलर व्हेरिएंटची किंमत, फर्स्ट सेल आणि ऑफर्स
हा फोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत ₹19,999 ठेवण्यात आली आहे. 8GB + 256GB स्टोरेज मॉडेल ₹21,499 मध्ये तर 12GB + 256GB स्टोरेजचा पर्याय ₹23,499 मध्ये उपलब्ध आहे.
Narzo 80 Pro च्या Nitro Orange रंगाचा पहिला सेल 1 मे 2025 रोजी होणार आहे. लॉन्च ऑफरअंतर्गत ग्राहकांना ₹1500 चा कूपन आणि ₹500 चा बँक डिस्काउंट मिळून एकूण ₹2000 ची सूट दिली जात आहे.
Realme Narzo 80 Pro 5G चे टॉप फीचर्स
Narzo 80 Pro मध्ये 6.7-इंचाचा FHD+ कर्व्ड AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस मिळतो. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7400 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 14GB पर्यंत डायनॅमिक रॅम (Dynamic RAM) मिळते. यामध्ये 80W फास्ट चार्जिंग आहे आणि कंपनीने 4 वर्षांची बॅटरी लाइफ गॅरंटी दिली आहे. हा फोन धूळ आणि पाण्यापासून संरक्षण (IP66+IP68+IP69 Rating) मिळवतो.
या फोनमध्ये 6050mm² VC कूलिंग सिस्टम दिले आहे. Narzo सिरीजमधील हा फोन 2 Android OS अपडेट आणि 3 वर्षांचे सिक्योरिटी अपडेट्स यांसह येतो. यात AI Ultra Clarity 2.0, AI Snap Mode आणि AI Eraser 2.0 सारख्या फीचर्सचा समावेश आहे. Realme च्या या फोनमध्ये 50MP IMX882 सेंसर, 2MP मोनोक्रोम कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.