Motorola घेऊन आला किफायतशीर स्मार्टवॉच, AMOLED डिस्प्ले आणि GPS सपोर्टसह

Motorola ने Moto Watch Fit नावाचे किफायतशीर स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. 16 दिवसांची बॅटरी लाइफ, AMOLED डिस्प्ले आणि GPS सपोर्टसह हे वॉच फिटनेस प्रेमींसाठी परिपूर्ण आहे.

On:
Follow Us

मोटोरोला (Motorola) ने अलीकडेच आपला मोटोरोला एज 60 सीरीज (Motorola Edge 60 Series) स्मार्टफोन जागतिक बाजारात सादर केला आहे. नवीन स्मार्टफोन्ससोबतच कंपनीने एक किफायतशीर स्मार्टवॉचही लॉन्च केले आहे, ज्याला Moto Watch Fit या नावाने बाजारात आणण्यात आले आहे.

यामध्ये अॅपल वॉचसारखा (Apple Watch) दिसणारा 1000 निट्स ब्राइटनेस असलेला AMOLED डिस्प्ले, GPS सपोर्ट आणि 16 दिवसांची दमदार बॅटरी लाइफ मिळते, ज्यामुळे कमी बजेटमध्ये उत्तम फिटनेस ट्रॅकर शोधणाऱ्या युजर्ससाठी (Users) हा एक परिपूर्ण पर्याय ठरतो.

यूकेमध्ये (UK) याची किंमत फक्त £89.99 (सुमारे ₹10,222) आहे. ही वॉच फक्त पॅंटोन ट्रेकिंग ग्रीन (Pantone Trekking Green) या रंगात उपलब्ध असेल.

मोठा AMOLED डिस्प्ले आणि Android कम्पॅटिबिलिटी

या वॉचमध्ये स्टाइल आणि फंक्शनॅलिटीचा उत्तम मिलाफ पाहायला मिळतो. वॉच अल्ट्रा थिन अॅल्युमिनियम फ्रेमसह येते आणि यामध्ये 1.9 इंचाचा AMOLED स्क्रीन दिला आहे, जो गोरिल्ला ग्लास 3 (Gorilla Glass 3) ने संरक्षित आहे. हा डिस्प्ले तीव्र उन्हातसुद्धा उत्कृष्ट व्हिजिबिलिटीसाठी 1,000 निट्स ब्राइटनेस प्रदान करतो.

ही वॉच केवळ Android साठी आहे, ज्यामुळे नोटिफिकेशन्स दाखवण्यासाठी आणि म्युझिक प्लेबॅक कंट्रोल करण्यासाठी ती फोनसोबत सहज सिंक होते. मात्र मोटोरोला (Motorola) च्या स्वतःच्या रिअल-टाईम ऑपरेटिंग सिस्टममुळे (Real-Time Operating System) ही वॉच थर्ड-पार्टी अॅप्सचा सपोर्ट देणार नाही.

Mahesh Bhosale

Hey, it's me, Mahesh. I'm a Marathi content writer with over two years of experience. I'm an expert in writing Marathi content on technology and automobiles for the MarathiGold.com

For Feedback - [email protected]
Join Our WhatsApp Channel