Ajit Pawar: येणाऱ्या काळात अजित पवारांनी मुख्यमंत्री पदी विराजमान व्हावे अशी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे. अजित पवारांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी तशा आशयाच्या शुभेच्छा संदेश असलेला केक कार्यकर्त्यांनी तयार केला होता.
पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांना (Ajit Pawar) शहरातील कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देत हा वाढदिवसाचा केक दिला आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अजितदादांनी तो कापला आणि कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. या विशेष शुभेच्छा संदेशामुळे हा केक सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
अजित पवार हे पिंपरी चिंचवडमध्ये आज म्हणजे रविवारी सकाळपासून सात वाजल्यापासून विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.
काही तासांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पिंपरीत मेळावा पार पडला. त्यानंतर आज अजित पवार गटाचा मेळावा पार पडत आहे. अजित पवार हे आगामी काळात मुख्यमंत्री होतील अशी आशा त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आहे.















