धन प्राप्तीसाठी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीच्या सोबत या दोन देवतांची पूजा करणे देखील आवश्यक आहे

यावर्षी लक्ष्मीपूजन 27 ऑक्टोबर रोजी आहे. दिवाळी मधील आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन होय. कारण याच दिवशी आपण धनाची देवी माता लक्ष्मीची पूजा करून त्यांना आपल्या घरामध्ये आगमन करण्यासाठी आमंत्रित करतो. तसेच आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी विनंती करतो.

दिवाळी हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण आहे आणि या दिवसाला आपण दीपोत्सव साजरा करतो म्हणजेच अनेक दिवे लावतो. का दिवालीच्या दिवशी लोक घरामध्ये दिवे लावून झगमगाट करतात. याच सोबत यादिवशी संध्याकाळी माता लक्ष्मी, सरस्वती आणि गणपती यांची पूजा केली जाते. पण याबद्दल अत्यंत कमी लोकांना माहिती आहे कि या दिवशी आपण माता लक्ष्मी सोबत सरस्वती आणि गणपतीची देखील पूजा करतो.

जाणकारांच्या अनुसार दिवाळीच्या दिवशी या तीन देवतांची एकत्र पूजा केल्याने धन, बुद्धी आणि ज्ञान यामध्ये वृद्धी होते आणि एक सुखदायक आयुष्य प्राप्त होते. खरंतर शास्त्रा मध्ये माता लक्ष्मी धनाची देवी असल्याचे सांगितले आहे. तर माता सरस्वती ही ज्ञान देणारी देवता आहे आणि गणपती हे बुद्धी देवता आहेत. माता लक्ष्मीच्या चित्रात त्यांच्या सोबत सरस्वती आणि गणपती देखील असतात.

दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने धन प्राप्ती होते. पण धन प्राप्तीसाठी ज्ञान आणि बुद्धी यांची आवश्यकता असते. त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीच्या सोबत माता सरस्वती आणि गणपती यांची पूजा केली जाते. कारण विना ज्ञान आणि बुद्धी व्यक्ती धन प्राप्ती करू शकत नाही आणि या दिवशी आपण गणपती आणि माता सरस्वतीची पूजा करून त्यांना बुद्धी आणि ज्ञान प्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करतो. ज्यामुळे आपण आपल्या जीवनात धन कमवू शकू.

अशी करा पूजा 

आपण दिवाळीच्या दिवशी सकाळी आपल्या घराची चांगली व्यवस्थित स्वच्छता करावी. सफाई केल्या नंतर घराची फुलांनी सजावट करा. ज्या जागी आपण पूजा करणार आहेत तेथे आपण रंगाची किंवा फुलांची रांगोळी काढावी.

संध्याकाळच्या वेळी आपण माता लक्ष्मी, सरस्वती आणि गणपतीची मूर्ती किंवा फोटो पाटावर ठेवा आणि जवळ दिवा प्रज्वलित करा.

पूजा सुरुवात केल्यावर सगळ्यात पहिले आपण या देवतांना सगळ्यात पहिले फळ आणि मिठाई अर्पित करा आणि दिवा लावून. गणपती बाप्पाचे सर्वप्रथम नाव घेऊन पूजा सुरु करावी.

पूजा आपण आपल्या पारंपारिक पद्धतीने करू शकता त्यानंतर शेवटी आरती करावी. तसेच गणपती, माता लक्ष्मी आणि सरस्वती यांना फुल अर्पित करावे. तसेच आपल्या तिजोरी मध्ये देखील फुल ठेवावे. पूजेत अर्पित केलेली मिठाई प्रसाद म्हणून सगळ्यांनी वाटून घ्यावी.

असे बोलले जाते कि दिवाळीच्या दिवशी घराला जेवढी रोषणाई करणे शक्य असेल तेवढी करावी. यामुळे आपले जीवन देखील प्रकाशाने उजळून निघते. या दिवशी फक्त तेलाचाच दिवा लावणे शुभ असते त्यामुळे लक्षात ठेवा या दिवशी तुपाचा दिवा लावू नये.