People

नोकरी सोडून इंजिनियर ने सुरु केला बिजनेस, 100 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना दिली आहे नोकरी

आपल्या देशात भिकारी दिसावेच नाहीत असे आपल्याला वाटते पण यासाठी आपण काय करतो. पण या इंजिनियरने एक असा व्यवसाय सुरु केला ज्यामुळे भिकाऱ्यांना रोजगार मिळेल आणि त्याला ही उत्पन्न होईल. चला पाहूया काय करतो हा युवक.

राजस्थान मधील तरुण इंजिनियर गणपत यादव हा एका मल्टीनेशनल कंपनी मध्ये लाखो रुपयाचा पगार असलेल्या नोकरीवर होता. पण आपण स्वता काही नवीन करावे या विचाराने त्याने ही नोकरी सोडली. मग तो एका अश्या स्टार्टअपच्या शोध करू लागला जो हर प्रकारे समाजाच्या हिताचा राहील. गणपत ने विचार केला की लोकांच्या समोर हात पसरवून भिक मागत उदरनिर्वाह करणाऱ्या भिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या कडून काम करून घेतले तर कसे राहील. यामुळे भिकारी पण आत्मनिर्भर होतील आणि त्यांनी केलेल्या कामामुळे समाज आणि देशालाही हातभार लागेल.

हाच विचार करून त्यांनी आपल्या गावी एक नव्या स्टार्टअपचा पाया रचला. त्यांनी ऑर्गेनिक फार्मिंग सुरु केली आणि 100 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना रोजगार दिला. ते भाजीपाला आणि फळ उत्पादन करून बाजार पेठे मध्ये विक्री करतात आणि यातून मिळणाऱ्या पैश्यातून ते भिकाऱ्यांना त्यांची मजुरी देतात. गणपत ने सुरु केलेल्या या स्टार्टअप मुळे एकीकडे जेथे भिकाऱ्यांना रोजगार मिळत आहे तसेच दुसरीकडे ऑर्गेनिक फार्मिंगला चालना मिळत आहे.

गणपतचे म्हणणे आहे की ऑर्गेनिक फार्मिग मध्ये चांगली कमाई होते त्यामुळे ते प्रोफेशनल लोकांना सोबत घेण्या एवजी मी आर्थिक परिस्थिती कमी असलेल्या लोकांना सोबत घेत आहेत.

गणपतचा हा स्टार्टअप यशस्वी झाला आहे. एकीकडे जेथे अनेक लोकांना रोजगार मिळत आहे तर दुसरा विचार केला तर समाजातील भिक मागणाऱ्या लोकांना रोजगार मिळाल्याने भिकाऱ्यांची संख्या कमी होण्याची आशा निर्माण होते.


Show More

Related Articles

Back to top button