celebrities

रियालिटी शो हारल्या नंतर देखील स्टार बनले हे सिंगर, नंबर 4 ला तर अपमानास्पद वागणूक देऊन काढण्यात आले होते

आजकाल आपले टैलैंट लोकांच्या समोर सादर करणे आणि प्रसिध्द होणे तसे सोप्पे झालेले आहे. टीव्ही आणि सोशल मिडियाच्या मदतीने हे अगदी सहज आणि सोप्पे बनले आहे. परंतु एक वेळ अशी होती कि आपले टैलैंट लोकांच्या समोर दाखवण्यासाठी लोकांना माध्यम नव्हते. रियालिटी शो काही प्रमाणात कंटेस्टेटसाठी बॉलीवूडचा रस्ता होता आणि जर तुम्ही शो जिंकला तर निश्चितच काम मिळत असे. जर रियालिटी शो जिंकला असेल तर बॉलीवूड मध्ये काम मिळणे सामान्य गोष्ट झाली होती. पण जर शो मध्ये पराजय होऊन देखील बॉलीवूड मध्ये राज्य करता येऊ शकते का? तर याचे उत्तर कदाचित तुम्ही नाही असे द्याल. पण जर कोणीही असे केले तर तुम्हाला त्याचे नक्कीच आश्चर्य होईल. आज या पोस्ट मध्ये आपण एक नाही तर अनेक सेलिब्रिटीज बद्दल बोलणार आहोत जे रियालिटी शो मध्ये हारले होते आणि त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी आणि मानसन्मान मिळवला आहे जे कदाचित अनेक विजेत्यांना देखील शक्य झालेले नाही. रियालिटी शो मधून आउट झालेले हे स्टार्स आज बॉलीवूड मध्ये राज्य करतात.

अरिजीत सिंह

या लिस्टमध्ये सगळ्यात पहिले नाव आहे तरुण पिढीतील प्रसिध्द गायक अरिजीत सिंह. सगळ्यात पहिले अरिजीत ‘फेम गुरुकुल’ नावाच्या एका रियालिटी शो मध्ये दिसला होता. परंतु या शो मध्ये अरिजीत दुसऱ्या नंबरवर राहिला तरीसुद्धा आज अरिजीत बॉलीवूड मधील सगळ्यात जास्त पॉपुलर सिंगर आहे. विशेषतः तरुणांमध्ये त्याची क्रेज आहे.

अंतरा मित्रा

अंतरा मित्रा देखील इंडियन आइडल मध्ये होती. परंतु ती शो जिंकू शकली नाही तरी सुध्दा आज ती बॉलीवूड मधील एक प्रसिध्द सिंगर आहे. तिने ‘गेरुआ’, ‘साड़ी के फॉल सा’, ‘भीगी सी भागी सी’ आणि ‘मनमा इमोशन जागे’ या सारखी गाणी गायली आहेत.

नक्काश अजीज

नक्काश अजीज देखील ‘इंडियन आइडल’ मध्ये कंटेस्टेंंट होता. त्यावेळी तो एलीमिनेट झाला पण आज बॉलीवूड मध्ये सिंगर आहे. नक्काशने ‘टुकुर टुकुर’, ‘सेल्फी ले ले रे’, ‘जबरा फैन’ आणि ‘क्यूटीपाई’ गाणे गायली आहेत.

नेहा कक्कड

नेहा देखील मोनाली सोबत ‘इंडियन आइडल 2’ मध्ये दिसली होती. त्यावेळी जजेज ने तिला काही विशेष पसंत केले नाही आणि सतत तिला खराब कमेंट्स दिल्या जायच्या. काही एपिसोड नंतर ती शो मधून बाहेर झाली. पण आज नेहा कक्कडला बॉलीवूड मधील एक यशस्वी सिंगर मानले जाते. तिने गायलेली गाणी सुपरहिट आहेत.

मोनाली ठाकूर

आज मोनाली ठाकूर इंडस्ट्री मधील एक प्रसिद्ध सिंगर असली तर सगळ्यात पहिले ती ‘इंडियन आइडल 2’ मध्ये कंटेस्टेंंट म्हणून दिसली होती. परंतु ती काही एपिसोडस नंतर आउट झाली होती परंतु आज ती बॉलीवूड मधील प्रसिध्द सिंगर आहे. मोनाली ‘लक्ष्मी’ नावाच्या फिल्म मध्ये लीड एक्ट्रेस देखील होती. प्रेक्षकांना तिचा अभिनय पसंत आला होता.


Tags
Show More

Related Articles

Back to top button