Connect with us

बुधवार 15 ऑगस्ट : आज या 4 राशीवर राहील परमेश्वराची कृपा, उघडतील नशिबाचे बंद दरवाजे

Today's Horoscope

बुधवार 15 ऑगस्ट : आज या 4 राशीवर राहील परमेश्वराची कृपा, उघडतील नशिबाचे बंद दरवाजे

आज बुधवार 15 ऑगस्ट चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Wednesday, August 15, 2018)

आपल्या आरोग्याबद्दल विशेषकरून रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. तुमच्या प्रियजनांनी केलेल्या विधानांवर तुम्ही खूपच अधिक हळवे व्हाल. तुमच्या भावनांना रोखा आणि कोणतेही बेजबाबदार कृत्य करू नका ज्यामुळे भविष्यात तुम्हाला पश्चात्ताप करण्याची वेळ येईल. तुमच्या मोबाईलमुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्याचा जास्त वापर करू नका. गुप्तशत्रू तुमच्याविषयीच्या फवा पसरविण्याची शक्यता आहे. तुम्ही काहीतरी घोडचूक करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य दुखावले जाण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी भविष्य (Wednesday, August 15, 2018)

शक्य असेल तर लांबचा प्रवास टाळणे चांगले. अशा प्रवासासाठी तुम्ही कमकुवत आहात, त्यामुळे हा प्रवास तुम्हाला आणखीनच कमकुवत बनवेल. प्रलंबित घटना,वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल.. इतर अनेक लोक तुम्हाला नवी स्वप्ने आणि आशा दाखवतील मात्र आपल्या प्रयत्नांवर बरेच काही अवलंबून असेल. एकतर्फी प्रेमावर वेळ वाया घालवू नका. आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे. समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील – लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्यके शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. कधीकधी वैवाहिक आयुष्यात खूप चिडचिड होऊ शकते आणि आज तुमची चिडचिड होईल, असे दिसते.

मिथुन राशी भविष्य (Wednesday, August 15, 2018)

मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनवस्था प्रसंग, नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल – म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. कौटुंबिक पातळीवरील काही अडचणी, प्रश्नांमुळे घरातील शांतता आणि निरोगी वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. तुमच्या रोमॅण्टिक जोडीदाराशी फोनवर बराच काळ न बोलून तुम्ही जोडीदाराला छळाल. काही काळ आपण केवळ स्वत:च्या जिवावरच काम खेचून नेत आहात असे चित्र असेल, सहकारी, सहयोगी तुमच्या मदतीस येतील, पण फार काही मदत देऊ शकतील असे दिसत नाही. तुम्हाला चुकीचा मार्ग दाखविणा-या व्यक्तीवर लक्ष ठेवा किंवा चुकीची माहिती देऊन तुम्हाला हानी पोहोचविण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल, पण तो/ती तुमच्यासाठी काहीतरी खास करेल.

कर्क राशी भविष्य (Wednesday, August 15, 2018)

आजच्या दिवशी तुमच्या चेह-यावरील निरंतर स्मित, नवख्या माणसामध्ये आपलेपणा निर्माण करेल. कोणाशी आर्थिक व्यवहार करायचे याची काळजी घ्या. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. आजचा दिवस कठीण असणार आहे; पण संयम आणि शांतता राखली तर प्रत्येक अडथळा पार करता येऊ शकेल. खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. स्पर्श, चुंबने, मुके, मिठ्या या सर्वांचेच वैवाहिक आयुष्यात विशेष महत्त्व असते. त्या महत्त्वाचा आज तुम्हाला अनुभव येईल.

सिंह राशी भविष्य (Wednesday, August 15, 2018)

खूपच चिंता केल्याने तुमची मानसिक शांतात भंग पावेल. कारण चिंता केल्यामुळे प्रकृती बिघडते. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. वैयक्तिक प्रश्न सोडविण्यासाठी मित्र आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. तुमच्या बॉसचा मूड कदाचित आज खूुुप खराब असेल, त्यामुळे त्याला हाताळणे तुम्हाला कठीण जाऊ शकेल. दुस-या-तिस-या व्यक्तींकडून ऐकलेल्या बातम्या तपासून खात्री करून घ्या. . जर तुम्ही कुणालातरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे बारगळली तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल.

कन्या राशी भविष्य (Wednesday, August 15, 2018)

अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. नवजात बालकांचा आजार तुम्हाला व्यस्त ठेवल. तुम्हाला त्याकडील त्वरित लक्ष द्याावे लागेल. योग्य तो वैद्याकीय सल्ला घ्या, छोटेसे दुर्लक्षदेखील प्रश्न गंभीर करू शकते. तुमच्या प्रेम जीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमत: फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. आपल्या प्लॅनमध्ये शेवटच्या क्षणी बदल होण्याची शक्यता असणारा दिवस. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही उत्तम चालले आहे.

तुल राशी भविष्य (Wednesday, August 15, 2018)

भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आज नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडेल – पुढे काय करायचे हे ठरविणे अवघड होऊन बसेल – इतरांची मदत घ्या. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. मुलांमुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी वात्सल्याने वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करुन त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवा. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा, मजा लुटा. अतिस्पष्टवक्तेपणा आणि भावनांना व्यावसायिक बैठकांमध्ये आवर घाला. आपल्या व्यावसायिक स्थानाला त्यामूळे अगदी सहजपणे धक्का बसू शकतो. पत्रव्यवहार काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल.

वृश्चिक राशी भविष्य (Wednesday, August 15, 2018)

व्यवस्थित व्यायाम करून तुमचे वजन नियंत्रणात आणण्याची गरज आहे. तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल – परंतु तुमच्या आजुबाजूच्या लोकांना टाकून बोलू नका किंवा तुम्ही एकटे पडाल. तुमच्या मनात कामाच्या ताणाचे विचार असले तरी तुमची प्रिय व्यक्ती रोमॅण्टिक आनंद देईल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेले वातावरण राहील. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. कामाच्या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अनुकूल असेल.

धनु राशी भविष्य (Wednesday, August 15, 2018)

आजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन तुमचे स्नायू मोकळे करा. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. आपला किंमती वेळ त्यांच्या बरोबर घालवा. पुन्हा एकदा आनंदी सोनेरी दिवस येण्यासाठी आपल्या रम्य आठवणीचा आधार घ्या. तुमच्या प्रेमसंबंधावर आज विपरीत परिणाम संभवतो. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यांमुळे तुमच्यावर तणाव येईल.

मकर राशी भविष्य (Wednesday, August 15, 2018)

तुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घ काळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. तुमच्या आवाक्याच्या बाहेर तुमचा खर्च होईल. त्यामुळे अनेक चालू असलेले प्रकल्प-योजनांना खीळ बसेल. आजच्या दिवशी नवा लूक, नवा पेहराव आणि नवे मैत्र लाभेल. आपल्या प्रियजनांबरोबर वेळ जाता जाणार नाही. तुमचा मूड खराब असल्यामुळे तुम्ही कार्यालयात कदाचित वादग्रस्त असू शकाल. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती ढासळल्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल, पण ही वेळ तुम्ही निभावून न्याल.

कुम्भ राशी भविष्य (Wednesday, August 15, 2018)

आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. मित्रांच्या योगाने महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क बनतील. बाहेरगावी जाऊन पार्टी करणे, प्रणयराधन करायला मिळण्याची शक्यता असल्याने उत्साह निर्माण होईल परंतु त्यामुळे तुम्ही थकून जाल. तुम्ही ज्या गोष्टी करीत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. नव्या कल्पनांची परिक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारावर संशय घ्याल, ज्यामुळे तुमच्यातील एकोप्याला तडा जाऊ शकेल.

मीन राशी भविष्य (Wednesday, August 15, 2018)

तुमच्या चपळाईच्या कृतीने तुमचे प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेले प्रश्न सुटतील. संशयास्पद आर्थिक भागीदारीला भूल नका. गुंतवणूक ही अतिशय काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. तुम्ही खरेदीला जाण्याची शक्यता अधिक आहे – परंतु तुम्ही अनावश्यक गोष्टींवर खर्च केलात तर तुमच्या जोडीदाराची नाराजी ओढवून घ्याल. तुमचे धैर्य पाहून तुम्ही प्रेर्म ंजकाल. कामातील अवघड टप्पा सहका-यांच्या वेळीच झालेल्या मदतीमुळे पार पडेल. त्यामुळे तुमची व्यावसायिक बाजू सांभाळणे, व्यावसायिक स्थान पुन्हा मिळविणे शक्य होईल. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठावठिकाणा ठेवणार नाहीत. क्षुल्लक वाद विसरू जेव्हा तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला मिठी मारेल तेव्हा आयुष्य खूपच सुंदर होणार आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top