धनतेरस आणि दिवाळीला चुकूनही या 3 वस्तू कोणालाही उधार देऊ नका, घरातून निघून जाईल माता लक्ष्मी

0
23

दिवाळी आलेली आहे आणि तिचा उत्साह वातावरणा मध्ये आपण जाणवू शकतो. सगळे हिंदू धर्मीय लोक वर्षातील सगळ्यात मोठ्या उत्सवाच्या तयारीला लागले आहेत. दिवाळी मध्ये सगळ्यात महत्वाचे दिवस धनतेरस आणि लक्ष्मीपूजन असतात. या दिवशी लोक आपल्या घरामध्ये धन आणि माता लक्ष्मी यांची पूजा करतात. यावर्षी धनतेरस 25 ऑक्टोबर 2019 तर लक्ष्मी पूजन 27 ऑक्टोबर 2019 रोजी आहे.

अश्या या वर्षातील सगळ्यात मोठ्या उत्सवा बद्दल काही काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. खरंतर आपल्याला लक्ष्मी पूजन आणि धनतेरस या दिवशी कोणत्याही व्यक्तीला 3 खास वस्तू कोणालाही उधार दिली नाही पाहिजे. जर आपण या वस्तू कोणाला उधार दिल्या तर घरातून माता लक्ष्मी म्हणजेच धन निघून जाते. त्यामुळे या वस्तू आपण उधार देणे टाळले पाहिजे. चला तर मंग जाणून घेऊ कोणत्या आहेत या वस्तू.

पैसे : धनतेरस किंवा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कोणालाही पैसे दिली नाही पाहिजेत. जर कोणालाही याची आवश्यकता असेल तर आपण त्यास काही दिवस थांबण्यास सांगू शकता. दिवाळी नंतर आपण त्यांची मदत करू शकता. पण धनतेरस आणि लक्ष्मी पूजनाच्या पैसे कोणालाही मदत देऊ नये. जर आपण असे केले तर येणाऱ्या काळात आपल्याला नुकसान सहन करावे लागू शकते. खरंतर धनतेरस आणि दिवाळीला घरातून पैसे जाणे अशुभ मानले जाते. यामुळे आपली पैश्याच्या बाबतीत नशीब खराब राहू शकते. त्यामुळे आपण या दिवशी कोणालाही पैसे देणे टाळले पाहिजे कारण यामुळे लक्ष्मी मातेला आपण नकळत आपल्या पासून दूर करत असतो.

अन्न : साखर, दही, भाजी अश्या वस्तू शेजारी लोक नेहमी आपल्याला मागत असतात. या वस्तू आपण इतर दिवशी त्यांना देऊ शकता पण धनतेरस आणि लक्ष्मीपूजन या दिवशी घरातील अन्न शेजाऱ्यांना देऊ नये. अन्न किंवा खाद्य पदार्थ खरंतर आपल्या लक्ष्मीचे प्रतीक आहे. यामुळे त्यांना या शुभ दिवशी घरातच ठेवले पाहिजे. यांना दुसऱ्यानं देण्याचा अर्थ आपण आपली बरकत इतरांना देत आहे. त्यामुळे ही चूक करू नका.

पूजा साहित्य : दिवाळी म्हणजेच लक्ष्मी पूजन आणि धनतेरस या दिवशी पूजेचे आणि सजावटीचे साहित्य कोणालाही उधार देणे टाळले पाहिजे. या वस्तू आपण आपल्या घरासाठी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी घेऊन आलेलो असतो. त्यामुळे या वस्तू आपण दुसऱ्याना देण्याचा अर्थ हा आहे कि आपण माता लक्ष्मीच्या पूजे बद्दल सिरीयस नाही आहे. त्यामुळे कमीत कमी दिवाळीच्या या दिवसात पूजेचे साहित्य आणि सजावटीचे सामान इतरांना देऊ नये. या चुकी मुळे आपल्या कुटुंबियांना आणि आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

या तीन वस्तू आपण धनतेरस आणि दिवाळी म्हणजेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कोणालाही देणे टाळले पाहिजे. आपल्याला त्यांना मदत करण्याची इच्छा असेल तर ती मदत आपण दिवाळी नंतर काही दिवसांनी करू शकतो.