Mobile Phone: अरे देवा! मोबाईल पाण्यात भिजला, पण काळजी करू नका ‘या’ टिप्स वापरा

Fix Your Wet Mobile Phone: आपल्या पैकी काही लोक प्रत्येक ठिकाणी सतत मोबाईल (Mobile Phone)घेऊन फिरतात. काहीजण तर बाथरूममध्ये देखील आपला मोबाईल फोन घेऊन जातात. पण अशावेळी फोन भिजण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी किंवा कधी पावसात भिजल्यामुळे फोन बिघडण्यापासून कसा वाचवता येईल चला समजून घेऊ.

फोन भिजला नाही पाहिजे याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, कारण फोन भिजल्यानंतर त्यामुळे आपली अनेक कामं अडुन राहू शकतात.

यावरचा एक उपाय म्हणजे काही वॉटरप्रूफ फोन लाँच झाले आहेत. असे असले तरी त्यांची किंमत खूपच जास्त असल्यामुळे त्यांना फार कमी प्राधान्य दिले जाते.

फोन भिजल्यावर काय करावे

पाण्यात भिजल्यानंतर फोन ऑन आहे का तपासून पहा, जर फोन ऑन असेल तर लगेच त्याला ऑफ करा.

त्यानंतर फोनमधून सिमकार्ड आणि एसडी कार्ड बाहेर काढून वेगळा करा.

यानंतर फोन एखाद्या कपड्याने कोरडा पुसून घ्या.

यानंतर फोनचे कव्हर काढून, फोन तांदुळ असलेल्या डब्यात २४ तासांसाठी ठेवा.

२४ तासांनंतर फोन ऑन होतोय की नाही हे पहा.

जर फोन ऑन झाला तर पहिले फोनचा स्पीकर चेक करा. जर स्पीकर चांगला असेल तर याचा अर्थ फोन बिघडला नाही.

जर या स्टेप्स वापरल्यानंतरही फोन चालू झाला नाही तर लगेच प्रोफेशनल व्यक्तीकडुन फोन तपासून घ्या.

फोनला पाण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही वॉटर रेजिसस्टंट कव्हर देखील वापरू शकता.