Connect with us

जर तुम्हाला पाहिजे स्वस्त गैस सिलेंडर, तर फक्त बुकिंग करताना वापरा ही ट्रिक

Money

जर तुम्हाला पाहिजे स्वस्त गैस सिलेंडर, तर फक्त बुकिंग करताना वापरा ही ट्रिक

भारता मध्ये जवळपास सर्व घरातील किचन मध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी गैस सिलेंडरचा वापर केला जातो. पण मागील काही महिन्या पासून गैस सिलेंडरचे भाव सतत वाढत आहेत. जर तुम्ही गैस सिलेंडरच्या वाढणाऱ्या भावाने वैतागले असाल तर आज आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगत आहोत जी वापरल्यामुळे गैस सिलेंडर तुम्हाला बाजार भावा पेक्षा स्वस्तात पडेल.

तुम्हाला आठवत असेल की केंद्र सरकार नोटबंदी नंतर ई-पेमेंट (कैशलेस व्यवहार) ला उत्तेजन देत आहे. याचाच एक भाग म्हणून गैस सिलेंडर ऑनलाईन बुकिंग करून ई-पेमेंट केल्यास सरकार 5 रुपये सूट देत आहे. या ऑफरची विशेषतः ही आहे की हा फायदा सबसिडी घेणाऱ्या आणि न घेणाऱ्या दोघांना मिळणार आहे.

गैस सिलेंडर ऑनलाईन बुकिंग करताना तुम्हाला ई-पेमेंट करण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेट बैकिंग असे ऑप्शन दिसतील. पेमेंट केल्या नंतर मिळालेला डिस्काउंट तुम्हाला बिला मध्ये दिसेल. तेल मंत्रालया नुसार ही ऑफर इंडियन ऑयल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांच्या गैस सिलेंडरवर लागू आहे.

तसेच ऑनलाईन पेमेंट केल्यामुळे बैंक आणि क्रेडिट कार्ड अनेक ऑफर देत असतात त्यामुळे त्याचाही फायदा आपल्याला मिळू शकतो अश्या प्रकारे ऑनलाईन गैस सिलेंडर बुक करून ई-पेमेंट केल्याने दुहेरी फायदा होईल.

अशी करा ऑनलाईन बुकिंग

ऑनलाईन गैस बुकिंग करण्यासाठी आणि डिस्काउंट मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या एंड्रॉयड मोबाइल फोन मध्ये गुगल प्ले स्टोर मधून एप डाऊनलोड करावा लागेल. येथे तुम्हाला तुमच्या एलपीजी कंपनीचे एप मिळेल. तुमच्याकडे ज्या गैस कंपनीचे ग्राहक आहात त्या कंपनीचे एप तुम्ही डाउनलोड करावे. येथे तुम्हाला इ-मेल आईडी सुध्दा द्यावी लागेल. या एप मधून तुम्हाला सिलेंडर बुकिंग हिस्ट्री, मैकेनिक सर्विस, गैस सिलेंडर डिलिव्हरी टाइम, लोकेट डिस्ट्रीब्यूटर्स आणि चेंज डिस्ट्रीब्यूटर्स सारख्या सुविधा मिळतील.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा :  दरमहा पैसे वाचविण्याच्या सात टिप्स

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top