विवाहित स्त्रियांनी आपल्या या 5 वस्तू कधीही कोणाही सोबत शेयर नाही कराव्यात

जवळपास प्रत्येक घर असे असते जेथे विवाहित स्त्रिया एकमेकांच्या सोबत वस्तू शेयर करतात आपले काम चालवून घेतात. एखाद्या मैत्रिणीने किंवा एखादी नातेवाईक महिला म्हणाली तुझी टिकली किती सुंदर आहे तर कपाळावरून काढून लगेच देणाऱ्या महिला देखील आहेत. तसे तर शेयर करणे चांगली गोष्ट असते पण काही वस्तू विवाहित महिलांच्या अश्या असतात ज्यांना एकमेकांच्या सोबत शेयर नाही केले पाहिजे.

विशेषतः या 5 वस्तू तर मुळीच शेयर नाही केल्या पाहिजेत. तसे तर या गोष्टी जास्त प्रचलित आहेत. कारण विवाहित स्त्रियांच्या या 5 वस्तू शेयर करण्याचा अर्थ असा आहे कि पती-पत्नी मधील नाते खराब होणे. असे सांगितले जाते कि या वस्तू आपसात शेयर केल्याने नात्यामध्ये दुरावा येतो तसेच पतीला आणि सौभाग्याला वाईट नजर लागते.

प्रत्येक महिलेच्या विवाहित होण्याची निशाणी असते भांगेतील कुंकू. लग्नाच्या वेळी महिला आपल्या पतीच्या हाताने कुंकू लावून घेते. त्यामुळे हे सौभाग्याची निशाणी आहे. यास कोणाही सोबत शेयर नाही केले पाहिजे याचा अर्थ आपल्या कुंकवाची डबी वेगळी ठेवावी. आपल्याला दुसऱ्याला कुंकू द्यायचे असेल तर आपण देवा जवळील कुंकू किंवा नवीन कुंकवाची डबी देऊ शकता.

विवाहित स्त्रीने आपले काजळ देखील कोणाही सोबत शेयर नाही केले पाहिजे. मंग ती व्यक्ती आपल्या कुटुंबातील असली तरी त्या सोबत काजळ शेयर करू नये. असे केल्याने पती चे प्रेम कमी होते अशी मान्यता आहे. दोघांच्या मध्ये वादविवाद वाढतात असे देखील मानले जाते.

विवाहित स्त्रीसाठी कपाळावरील टिकली महत्वाची आहे. कुंकू जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्व टिकलीला देखील आहे. असे मानले जाते कि आपल्या कपाळावरील टिकली काढून कधीही दुसऱ्याच्या कपाळावर नाही लावली पाहिजे. जर आपल्याला दुसऱ्याला टिकली द्यायची असेल तर नवीन टिकली देऊ शकता.

मेहंदी विवाहित स्त्रीच्या हातावरील तिच्या पतीच्या प्रेमाची आणि तो सुरक्षित असल्याची निशाणी आहे. असे मानले जाते कि मेहंदी जेवढी गडद तेवढे पतीचे प्रेम जास्त  असते. त्यामुळे मेहंदी शेयर केल्याने पतीचे प्रेम कमी होण्या कडे इशारा आहे.

बांगड्या आणि पैंजण विवाहित स्त्रीच्या शृंगाराचा महत्वाचा भाग आहे. अनेक वेळा असे महिला आपल्या कपड्यांच्या मैचिंग पैंजण आणि बांगड्या परिधान करण्यासाठी एकमेकांना शेयर करतात. पण यांना शेयर करणे अशुभ मानले जाते.

वरील गोष्टी वर्षानुवर्षे पिढीजात चालत आलेल्या मान्यता आहेत. ज्यांना यांच्यावर विश्वास असेल ते यास फॉलो करू शकतात. ज्यांना आपल्या परंपरेवर आणि पूर्वजांनी केलेल्या नियमांवर विश्वास नाही ते लोक आपला मार्ग निवडण्यास मोकळे आहेत. परंतु वरील गोष्टी पूर्णतः सत्य किंवा असत्य असल्याचा दावा आम्ही किंवा इतर कोणीही करू शकत नाहीत. हा केवळ प्रत्येकाच्या विश्वासाचा प्रश्न आहे.