foodhealth

पोटाशी संबंधीत सर्व प्रकारच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय

पोटाची समस्या होण्याचे मुख्य कारण लोकांचे खान-पान चुकीचे असणे. आजकाल लोक जास्त करून बाहेरील अन्न खाणे फास्ट फूड खाणे पसंत करतात. ज्यामुळे त्यांना जाणते अजाणतेपणे या समस्या होतात. जर व्यक्तीला पचन संबंधी समस्या असेल आणि सोबतच अन्य कोणतीही समस्या असेल तर अश्या परस्थितीत त्याने पोटाची जास्त काळजी घ्यायला पाहिजे. कारण पोट निरोगी असेल तर इतर आजार होण्याची शक्यता कमी होते तसेच जर पोट निरोगी नसेल तर इतर आजार जास्त वाढण्याची शक्यता वाढते.

पोटाच्या समस्ये पासून सुटका मिळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय

पोट दुखी ही अत्यंत सामान्य समस्या आहे. यापासून सुटका मिळवण्यासाठी थोडीशी लाल मिरची मध्ये गुळ एकत्र करून खावे. यानंतर देखील जर तुम्हाला आराम नाही मिळाला तर डॉक्टरांना संपर्क करा.

जर पोट व्यवथित स्वच्छ होत नसेल तर पूर्ण दिवस आळस राहतो. कोणत्याही कामात मन लागत नाही. जर तुमचेही पोट सकाळी व्यवस्थित रिकामे होत नसेल तर एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा खाण्याचा सोडा मिक्स करून प्यावे. यामुळे बद्धकोष्ठ पासून मुक्ती मिळेल.

सकाळी टॉयलेटला जाण्या अगोदर एक ग्लास पाणी प्यावे. दुपारी जेवल्यानंतर एक ग्लास लस्सी आणि रात्री जेवल्यानंतर एक ग्लास दुध सेवन करणे पोटासाठी फायदेशीर आहे.

जर तुम्हाला भूक न लागण्याची समस्या असेल तर याचा अर्थ तुमच्या पचनशक्ती मध्ये गडबड आहे. असे असल्यास थोड्याथोड्या वेळात काळे मीठ चाटावे. राईच्या तेला मध्ये बनलेले अन्न खावे यामुळे देखील भूक लागते. यामुळे तुमची पचनक्रिया देखील व्यवस्थित होते.

रिकाम्या पोटी काही वस्तू खाण्यामुळे देखील आरोग्यावर वाईट परिणाम होतो. ज्यांच्या सेवनामुळे पोटामध्ये एसिड बनते त्या वस्तूंना रिकाम्या पोटी खाऊ नये. मसालेदार अन्न, आंबट फळे, टमाटर, सोडा, मद्य आणि चहा कॉफी रिकाम्या पोटी घेऊ नये.

आवळा पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. हा पोटाच्या सर्व समस्ये पासून मुक्ती मिळवून देण्यासाठी सक्षम आहे. दररोज एक कप पाण्यामध्ये 2 चमचे आवळा रस एकत्र करून प्यावे. आवळा सेवन केल्यामुळे शरीरातील विषारी तत्व बाहेर निघून जातात.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : सकाळी पहिल्यांदा पाणी कधी प्यावे याचे गुपित तुम्हाला माहीत आहे का

Show More

Related Articles

Back to top button