Connect with us

सरदार पटेल यांची मूर्ती 2 आठवडयात तुटत आहे? जाणून घ्या या वायरल फोटोचे सत्य काय आहे

Viral

सरदार पटेल यांची मूर्ती 2 आठवडयात तुटत आहे? जाणून घ्या या वायरल फोटोचे सत्य काय आहे

जगातील सगळ्यात उंच मूर्ती असल्याचा मान मिळवणारी स्टैच्यू ऑफ यूनिटी मध्ये भेगा पडत आहेत. असे आम्ही नाही तर मागील काही दिवसा पासून सोशल मिडीया वर वायरल मेसेजेस मध्ये बोलले जात आहेत. जवळपास 3000 करोड रुपये खर्च करून बनवलेल्या या मूर्तीची उंची 182 मीटर आहे आणि ही सरदार वल्लभभाई यांची मूर्ती आहे आणि त्यांच्या जन्मदिवसाच्या मौक्यावर प्रतिस्थापित केली होती.

यानंतर आता या बातम्या येत आहेत कि मूर्ती मध्ये भेगा पडत आहेत आणि या मूर्तीच्या तुटण्याच्या बातम्या सोशल मिडीयावर भरपूर वायरल होत आहेत. फोटो मध्ये सरदार पटेल यांच्या पायाकडील भाग दिसत आहे ज्यावर पांढऱ्या रंगाच्या रेषा दिसत आहेत आणि दावा केला जात आहे कि या रेषा म्हणजे भेगा आहेत. तर काय खरच मूर्ती बनल्याच्या दोन आठवडयातच तुटायला लागली आहे का सरदार पटेल यांची मूर्ती किंवा हा एक फक्त भ्रम आहे, याबद्दल आज येथे सविस्तर माहिती घेऊ.

दोन आठवडयातच तुटायला लागली का सरदार पटेल यांची मूर्ती का हा फक्त एक भ्रम आहे

एका वेबसाईटने या वायरल मेसेजच्या मागील सत्य शोधण्यासाठी प्रयत्न केले त्यामध्ये काही गोष्टी समोर आल्या. 31 ऑक्टोबर 2018 रोजी जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी या मूर्तीचे उदघाटन केले तेव्हाचे फोटो स्टैच्यू ऑफ यूनिटीच्या वेबसाईटवर अपलोड केलेले आहेत आणि जेव्हा तुम्ही या फोटोकडे पाहाल तेव्हा देखील फोटो मध्ये पटेल यांच्या पाया कडील भागात पांढऱ्या रंगाच्या रेषा दिसतील. याचा अर्थ हे फोटो मूर्ती बनत असल्या वेलीच्या आहेत पण या रेषा कश्या आहेत आणि या रेषांचा अर्थ काय आहे? खरतर या बद्दल जेव्हा मिडियाने विस्तारात माहिती काढली तेव्हा स्टैच्यू ऑफ यूनिटी बनवताना सीईओ आईके पटेल यांनी याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या.

काय आहे या पांढऱ्या रेषांचे सत्य

आईके पटेल यांनी सांगितले कि 182 मीटर उंचीची मूर्ती एक पार्ट मध्ये बनवणे शक्य नव्हते यासाठी मूर्ती मध्ये 8 एमएमच्या कास्याच्या प्लेट खास पद्धतीने वेल्डिंगने एकत्र जोडल्या आहेत. प्लेट्स विशेष वेल्डिंगने जोडल्यामुळे मूर्ती अजून जास्त मजबूत होते आणि यामध्ये दिसणाऱ्या पांढऱ्या लाईन वेल्डिंगचे जोड आहेत. ज्यांना पाहिल्यास स्वाभाविक पणे कोणासही भेगा पडल्याचा भास होतो पण या भेगा नाही स्टैच्यू बनवण्यासाठी केलेल्या वेल्डिंगचा तो भाग आहे. स्टैच्यू ऑफ यूनिटी मध्ये भेगा पडल्याच्या बातम्या पूर्णतः अफवा आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top