celebrities

आजारपणामुळे फक्त 23 किलो झाले होते एक्ट्रेसचे वजन

मार्च मध्ये मुंबईच्या शिवडी हॉस्पिटलच्या जनरल वार्ड मध्ये टीबीचा उपचार करत असलेल्या सलमान खानच्या ‘वीरगती’ चित्रपटाची एक्ट्रेस पूजा डडवाल रीकवर झाल्यानंतर 7 ऑगस्टला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाली. पूजाने गोव्याला जाण्याच्या अगोदर एका एंटरटेनमेंट पोर्टलला दिलेल्या इंटरव्यू मध्ये तिला मदत करणाऱ्या सलमान खानचे आभार मानले. पूजाने सांगितले ‘कपडे, साबण, डायपर, अन्न आणि औषध ते सर्व आवश्यक वस्तू आणि देखरेख सलमानच्या फाउंडेशन ने केली. आज मी जिवंत आहे तर फक्त सलमानमुळे.’

पूजाचे डॉक्टर ललित आनंदे यांनी सांगितले कि मल्टीविटामिन आणि सप्लीमेंट्स घेतल्यानंतर पुजा आजारातून बरीच रिकव्हर झाली आहे.

आजाराच्या अगोदर पूजा गोव्यात कसीनो मैनेज करत होती. पूजाने सांगितले कि ‘साधारण एक वर्षभर आधी तिला टीबी असल्याचे समजले. मी मागील काही वर्षापासून गोव्यात कसीनो मैनेज करत होती. आजारपणाच्या काळात माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक राहिले नाहीत. मी चहा-पाणी घेण्यासाठी देखील दुसऱ्यावर अवलंबून झाले.’

पुजाच्या जवळील लोकांच्या मते, आजारपणामुळे तिच्या नवऱ्याने आणि फैमिलीवाल्यांनी तिला एकटे सोडले. योग्य उपचार न झाल्यामुळे तिची स्थिती अजून जास्त बिघडली.

23 किलोची झाली होती पूजा

जेव्हा पूजा मार्च महिन्यात हॉस्पिटल मध्ये एडमिट झाली होती तेव्हा टीबीमुळे तिचे वजन फक्त 23 किलो राहिले होते. चांगला उपचार आणि चांगला डाइट मिळाल्याने आता तिचे वजन 20 किलो वाढले आहे. डॉक्टर ललित आनंदे यांचे म्हणणे आहे कि पुजाची विल पॉवर चांगली होती म्हणून ती या आजारातून बाहेर पडू शकली. त्यांनी सांगितले कि जेव्हा पुजाला ते वार्ड भेटले होते तेव्हा तिने त्यांना सांगितले होते कि तिला पुन्हा चालायचे आहे आणि आपल्या पायावर उभे राहायचे आहे.

रवि किशन ने देखील केली मदत

रवि किशन जो भोजपुरी चित्रपटाचा सुपरस्टार आहे आणि बॉलीवूड मध्ये देखील काम करतो. त्याने पप्पू यादव यास पुजाच्या मदतीसाठी पाठवले होते. पप्पूनेच आपल्या फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला होता ज्यामध्ये पूजा जनरल वार्ड मध्ये दिसत होती आणि रवि किशनकडून एक व्यक्ती फळे आणि पैसे देत होता. एका बातचीत दरम्यान रवि किशनने सांगितले कि काही वर्षापूर्वी त्याने पूजा सोबत डायरेक्टर विनय लाडच्या एका चित्रपटा मध्ये काम केले होते. परंतु रवि किशन याने मदत म्हणून पुजाला किती पैसे दिले होते याचा खुलासा केला नाही.

पूजाचा एक व्हिडीओ वायरल झाला होता

पूजा डडवालचा एक व्हिडीओ वायरल झाला होता ज्यामध्ये ती आपल्या मदतीचे आवाहन करत होती. हा व्हिडीओ वायरल झाल्या नंतर सलमान खानच्या बीइंग ह्युमन ने तिची मदत केली होती. पुजाच्या आजारा बद्दल सलमान खानने एका इवेन्ट मध्ये मिडीयाला सांगितले कि ‘हे अतिशय दुखद आहे. मला याबद्दल पूर्वी माहिती नव्हते. पण, आता आमची टीम पूजा जवळ पोहचली आहे आणि तिला मदत देण्यात येत आहे. ती लवकरच बरी होईल.’


Show More

Related Articles

Back to top button