पूजे मध्ये फोडलेला नारळ खराब निघण्याचे काय असतात संकेत… काय आहे मान्यता

काही वेळा पूजे मध्ये ठेवलेला नारळ फोडल्यावर तो खराब निघतो त्यामुळे आपण अस्वस्थ होतो आणि हे काही अघटित होण्याचे संकेत तर नाहीत ना असे मना मध्ये येते. आपल्याला माहीत आहेच कि नारळ हे शुभ मानलं जात आणि त्यास माता लक्ष्मीचे प्रतीक देखील समजलं जात. त्यामुळे असे मानले जाते कि पूजे मध्ये नारळ असणे आवश्य असते. पण काही वेळा असे होते कि आपण जो नारळ पूजे मध्ये ठेवलेला असतो तो आतून खराव निघतो आणि आपल्याला वाटते कि परमेश्वर आपल्यावर नाराज झाले आहेत किंवा काही संकट येणार आहे. असे अनेक विचार आपल्या मना मध्ये येतात. पण आज आपण जाणून घेऊ नारळ खराब निघण्याचा काय अर्थ असतो. नारळ खराब निघण्याचा अर्थ काही अशुभ झाले आहे किंवा काही अनिष्ट होणार आहे असे नाही. यांच्या विरुद्ध नारळ खराब निघणे शुभ मानले जाते आणि हे तर परमेश्वराचे खास संकेत समजले जातात. आज आपण या बद्दल माहिती घेऊ.

नारळ खराब होण्याचे संकेत

लहान लहान गोष्टी आणि लहान लहान कारणे देखील आपल्या जीवनावर मोठा प्रभाव करत असतात आणि माहितीच्या अभावी आपण भ्रमामध्ये जगतो. काही असेच नारळाच्या बाबतीत देखील होते बहुतेक वेळा नारळ खराब निघाले कि लोक निरनिराळ्या शंका काढतात. आपल्याला दुकानदारावर राग देखील आला असेल. हे तर आपल्याला माहीत असेलच कि हिंदू धर्म सनातन धर्म आहे आणि ज्याच्या आपल्या मान्यता आहेत. प्रत्येक गोष्टी बद्दल आपलं एक वेगळं मत आहे आणि पूजेच्या नारळाचे खराब होण्या मागे देखील एक विशष अर्थ आहे. मान्यते अनुसार जर पूजेतील नारळ खराब निघाला तर याचा अर्थ असतो कि परमेश्वरा ने स्वतः प्रसाद ग्रहण केला आहे. त्यामुळे तो नारळ आतून खराब झाला आहे. एवढेच नाही तर नारळ खराब होण्याचा अजून एक संकेत आहे कि आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत.

नारळ खराब निघणे म्हणजे मनोकामना पूर्ण

पूजेतील नारळ खराब निघणे म्हणजे याचा अर्थ आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. यावेळी आपण ज्या इच्छा मनात ठेवल्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत. त्यामुळे पुढील वेळी जेव्हा पूजेतील नारळ खराब निघाला तर काळजी करू नका तर परमेश्वराने आशीर्वाद दिला असे समजा. या वेळी आपण परमेश्वरा समोर जी मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केली आहे ती पूर्ण होणार आहे असा विश्वास ठेवा.

जर नारळ चांगला निघाला तर काय केलं पाहिजे

 

वर आपण नारळ खराब निघाला तर काय अर्थ मानला जातो हे पाहिलं. पण जर नारळ चांगला निघाला तर काय केलं पाहिजे हे आता जाणून घेऊ. पूजा करताना नारळ जर चांगला निघाला तर तो ठेवला नाही पाहिजे तर त्यास प्रसाद स्वरूपात सगळ्यांना देऊन प्राशन केला पाहिजे. यामुळे पूजेचे फळ सगळ्यांना मिळते.