सोशल मीडिया वर माय-लेकीला पाहून कंफ्युज झाले लोक, कोणालाही समजत नाही आहे दोघीं मध्ये कोण आई आणि मुलगी कोण आहे

सोशल मीडिया वर लोकांना जे आवडत ते वायरल होण्यास वेळ लागत नाही. फेमस होण्याचा सगळ्यात सोप्पा आणि स्वस्त मार्ग म्हणजे सोशल मीडिया आहे. आजकाल सोशल मीडियावर रश्मी सचदेवा नावाच्या एका महिलेचे फोटो तिच्या मुली सोबत जास्त वायरल होत आहेत. रश्मी कोणीही सामान्य स्त्री नसून मिसेज युनिव्हर्स युरो एशिया विनर आहे. रश्मी सचदेवा अत्यंत सुंदर आहे. केवळ आईच नाही तर मुलगी देखील तेवढीच सुंदर आहे. होय, सध्या माय-लेकीचे फोटो सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहेत. खरंतर दोघीही एवढ्या सुंदर आहेत कि आई आणि मुलगी यामधील फरक समजणे कठीण आहे.

19व्या वर्षीच रश्मी ने लग्न झाले होते

वयाच्या 19 व्या वर्षीच रश्मीचे लग्न दिल्ली मधील एक चार्टड अकाउंटेंट सोबत झाले होते. रश्मीच्या पतीचे नाव मनोज सचदेवा आहे. 13 सप्टेंबर 1995 मध्ये तिने मुलीला जन्म दिला. मुलीचे नाव अस्का ठेवलं. मुलीला सांबाळून रश्मीने इंटीरियर डिजाइनिंग मध्ये डिप्लोमा केला. आता तिची मुलगी 24 वर्षांची झाली आहे. अस्का दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये इंग्लिश ऑनर्सचा कोर्स करत आहे.

फोटो काढून घेण्याचा होता छंद

रश्मीने इंटरव्ह्यू मध्ये सांगितले कि तिला लहानपणा पासून फोटो काढून घेण्याचा छंद आहे किंवा हौस आहे असे देखील बोलू शकता. तिने सहजच एका मैगजीनसाठी आपला फोटो पाठवला आणि तो सिलेक्त झाला. रश्मी ने सांगितलं कि 2015 मध्ये दिल्लीत विवाहित महिलांची एक ब्युटी कांटेस्टचे आयोजन झाले होते. या कांटेस्ट मध्ये तिची एक मैत्रीण भाग घेत होती.

मुलीच्या हट्टामुळे घेतला भाग

रश्मी ने सांगितले कि हे पाहून माझ्या मुलीने देखील हट्ट केला आणि मला देखील या स्पर्धेत भाग घेण्यास सांगितले. अगोदर मी नकार दिला पण तिच्या हट्टामुळे भाग घ्यावाच लागला. या नंतर मी मिसेज इंडिया आणि मैसेज एशिया इंटरनेशनल पुरस्कार मिळवला. त्यानंतर मी चीन मधील ग्वांगझू मध्ये होणाऱ्या मिसेज युनिव्हर्ससाठी रवाना झाली जेथे मी मिसेज युनिव्हर्स गोल्डन हार्ट चे टायटल जिंकले.

हे पुरस्कार जिंकली आहे रश्मी

रश्मी ने आता पर्यंत आपल्या नावे अनेक पुरस्कार केलेले आहेत. तिने वाइब्रेंट मिसेज दिल्ली, मिसेज यूनिवर्स गोल्डन हार्ट, मिसेज यूनिवर्स यूरेशिया, मिसेज एक्सक्विजिट, एलीट मिसेज इंडिया पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. या व्यतिरिक्त रश्मी निवेदिता फाउंडेशन आणि दृष्टिकोण फाउंडेशन NGO सोबत काम करते.

चर्चेत असतात आई आणि मुलगी

माय-लेक सोशल मीडियावर आपली छाप पाडण्यात देखील यशस्वी राहिल्या आहेत. देशा मध्ये होणाऱ्या मोठ्या इव्हेंटस मध्ये रश्मी सचदेवा यांना पाहिले गेले आहे. ती अनेक प्रोडक्त्त लॉन्च मध्ये देखील उपस्थित असते. तर मुलगी अस्का देखील एखाद्या मॉडल पेक्षा कमी नाही आहे. अस्का ला सुपर मॉडल ऑफ द वल्ड ची ऑफर आली होती. ज्यास तिने नकार दिला. अस्का ला आपले करियर होम डेकोर मध्ये करायचे आहे. दोघीही सोशल मीडियावर एक्टिव आहेत. आजकाल त्यांच्या सुंदरतेची चर्चा सर्वत्र होत आहे. आपणही पहा आई आणि मुलीचे सुंदर फोटो.