moneyPeople

खबरदार! आपल्या या सवयीमुळे होतो फोनचा स्फोट

तुम्हाला असे काही मेसेजेस आले असतील ज्यामध्ये लिहिलेले असते की अमुक एका नंबर फोन आला आणि त्यामुळे फोनचा स्फोट झाला. फोनला चार्गिंग लावला त्यानंतर स्फोट झाला किंवा फोनवर बोलता बोलता अचानक स्फोट झाला. पण यासर्वामुळे गोंधळ हा होतो की सामान्य लोक संभ्रमात पडतात की नक्की कारण काय आहे. पण खरे कारण काय असते हे कसे समजेल तर ते कारण आहे फोन जास्त गरम झाल्यामुळे.

फोन चार्जिंग करताना

फोन चार्जिंगला लावल्यावर फोनला आराम द्यायचा असतो. त्यावेळेत फोनवर बोलणे किंवा इन्टरनेट वापरणे ही कामे केली नाही पाहिजेत. फोन चार्ज होत असताना बोलणे तर अत्यंत धोकादायक असते. त्यासाठी जर फोनला चार्ज करताना फोन स्वीच ऑफ करा ज्यामुळे कोणाचे फोन येणार नाहीत व आपल्याला फोन चार्ज करताना बोलावे लागणार नाही.

रात्रभर फोन चार्ज करू नका

काही लोकांना सवय पडली आहे कि ते रात्री झोपताना फोनला चार्ज करण्यासाठी ठेवतात आणि सकाळी उठल्यावर तो काढतात. पण असे केल्यामुळे फोन ओव्हर चार्ज होतो ज्यामुळे फोनचा स्फोट होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे करणे बंद करा.

चार्जर ओरिजिनल वापरा

आपल्या फोनचा चार्जर खराब झाला की आपण पैसे वाचवण्यासाठी लोकल दुकानातून चालू कंपनीचे चार्जर घेतो पण असे करू नये. ज्या कंपनीचा फोन आपण वापरतो त्याच कंपनीचा चार्जर वापरावा. जेथे आपण हजारो रुपयाचे फोन वापरता तेव्हा 200 ते 500 रुपायाकडे पाहू नका ओरिजिनल चार्जर खरेदी करा. वाटल्यास तुम्ही यासाठी फोनच्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन ओरिजिनल चार्जर खरेदी करू शकता.


Show More

Related Articles

Back to top button