dharmik

ही 4 कामे करत असाल तर त्वरित थांबवा अन्यथा होईल सर्वनाश, जाणून घ्या शास्त्र काय म्हणते

बहुतेक लोकांना अश्या काही सवयी असतात ज्या कधीकधी त्यांना वाईट आहेत हे माहित असते तर कधी ते माहित नसते किंवा त्याची जाणीव नसते आणि त्यामुळे त्यांचे जाणते अजाणतेपणी नुकसान होते किंवा येणाऱ्या काळात नुकसान होणार असते.

मनुष्याला सामान्य वाटणाऱ्या काही सवयीसुद्धा तुमच्या कुळाचा नाश करू शकतात. शुक्रनीतीमध्ये 4 अशाच सवयींविषयी सांगितले आहे, ज्यापासून प्रत्येकाने दूर राहावे.

परस्त्री सोबतच्या सोबत संबंध ठेवणे

परस्त्रीकडे वाईट दृष्टीने पाहणे किंवा तिच्याशी संबंध प्रस्थापित करणे महापाप मानले जाते. जी व्यक्ती इतर कोणत्याही स्त्री सोबत संबंध ठेवतो किंवा तिचा विचार करतो तो राक्षस प्रवृत्तीचा मानला जातो आणि त्याला नरकात विविध प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात. हे पाप कर्म कोणत्याही कुटुंबाला नष्ट करू शकते.

खोटं बोलणे

अनेक लोकांना पावलोपावली खोट बोलण्याची सवय असते. त्यांना त्यांची ही सवय फार सामान्य वाटते, परंतु हीच सवय त्यांना नष्ट करू शकते. खोट बोलल्याने फक्त स्वतःलाच नाही तर कुटुंबातील सदस्यांनाही दुःख आणि अडचणींना सामोरे जावे लागते. या सवयीपासून जेवढे दूर राहाल तेवढेच चांगले राहील.

कुटुंबाच्या चालीरीती आणि परंपराविरुद्ध काम करणे

अनेक लोक घरातील थोरमोठ्या लोकांचा मान-सन्मान ठेवत नाहीत, तसेच त्यांनी सांगितलेल्या घराच्या परंपरांचे पालन करत नाहीत. असे लोक आपल्या कुलाच्या विनाशाचे कारण होतात. जे मनुष्य घराच्या नियम आणि परंपरांचा सन्मान करत नाही, त्यांना विविध प्रकारच्या दुःख आणि अडचणींना सामोरे जावे लागते.

मांसाहार सेवन

शास्त्रांमध्ये जीवांची हत्या करणे किंवा त्यांचे सेवन करण्यास मनाई केलेली आहे. असे करणाऱ्या व्यक्तीला देवतांची कृपा प्राप्त होत नाही. शुक्र नीतीनुसार ही सवय कोणत्याही व्यक्तीच्या कुटुंबाचा नाश करू शकते.


Tags
Show More

Related Articles

Back to top button