astrology

30 एप्रिल ते 18 सप्टेंबर पर्यंत शनी राहील वक्री, सगळ्या 12 राशीवर होणार याचा परिणाम

30 एप्रिल 2019 रोजी शनी धनु राशी मध्ये वक्री होत आहे. आता हा ग्रह 18 सप्टेंबर 2019 पर्यंत वक्री राहील. शनी मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे. शनिदेव हे न्यायाधीश मानले जातात. हे सूर्यपुत्र आहेत आणि आपल्या कर्माची फळे आपल्याला देतात. चाल बदलल्यामुळे याचा परिणाम सगळ्या राशीवर शनीचा परिणाम जाणवेल. चला पाहू शनी वक्री झाल्यामुळे सगळ्या 12 राशीवर याचा काय परिणाम जाणवणार आहे.

मेष राशी : शनी वक्री झाल्यामुळे एखाद्या मोठ्या कामासाठी वर्तमान स्थान सोडावे लागू शकते. नोकरी मध्ये लाभ आणि संतान सुख प्राप्त होईल. वाहन सुख मिळेल. कुटुंबाच्या मदतीने वादविवादा मध्ये विजय प्राप्ती होईल.

वृषभ राशी : वक्री शनी या राशीसाठी देखील फायदेशीर राहील. योजना यशस्वी होतील आणि आर्थिक लाभ शक्य होईल. ध्येय प्राप्ती करण्यात यश मिळेल. एखाद्या मोठ्या यशामुळे प्रसन्नता होईल. मित्रांचे सहकार्य प्राप्त होईल.

मिथुन राशी : शनी वक्री झाल्यामुळे आपल्या अडचणीत वाढ होईल. कामामध्ये मन लागणार नाही. निराशेची भावना वाढेल. उत्सवांच्या बद्दल उदासीनता राहू शकते. परंतु काळजी करण्याचे कारण नाही. लवकरच नशिबाची साथ आपणास मिळण्यास सुरुवात होईल.

कर्क राशी : अज्ञात भय आणि चिंता राहील. विचारपूर्वक काम कराल आणि आवश्यक पाऊले उचलण्यात उशीर होईल. वादविवादाच्या बाबतीत अतिसतर्कता बाळगण्याची सवय होईल आणि संपर्कांचा फायदा घेण्यात यश मिळणार नाही.

सिंह राशी : शनी वक्री होण्याचा या राशीवर जास्त परिणाम होणार नाही. परिस्थिती सामान्य राहील. कामामध्ये कठोर परिश्रमा नंतर आणि उशिराने यश प्राप्ती होईल. प्रभाव वाढेल.

कन्या राशी : हा काळ अत्यंत दिलासा देणारा राहील. नवीन योजना बनवाल आणि त्या यशस्वी होतील. पूर्वीच्या काळ पासून असलेल्या अडचणी दूर होतील आणि धन लाभ होईल.

तुला राशी : शनी वक्री होणे आपल्यासाठी फायदेशीर राहील. धनाच्या सोबत मानसन्मानात वाढ होईल. तीन महिन्यापासून होत असलेले नुकसान भरून निघेल आणि कार्याच्या बाबतीत सावध राहाल. प्रभाव वाढेल.

वृश्चिक राशी : सावध राहावे आणि कोणत्याही कामास हलक्यात घेऊ नये. विचारपूर्वक कामे करावी आणि लालच देणाऱ्या योजनांपासून दूर राहावे. गुप्त गोष्टी कोणासही सांगू नयेत. वाहन सावधानतेने चालवावीत.

धनु राशी : अत्यंत सावधान राहण्याची गरज आहे. कार्यात विलंब झाल्याने त्रास होईल. नवीन समस्या उत्पन्न होतील. धनाची कमतरता जाणवेल. आपत्यामुळे दुःख मिळू शकते.

मकर राशी : शनी वक्री होण्याचा लाभ या राशीला मिळणार. धन आणि आरोग्यात लाभ होण्याच्या सोबतच सन्मानात वाढ होईल. संताना कडून लाभ होईल. अनेक कार्यात यश मिळेल. स्थायी संपत्ती मधून फायदा मिळेल.

कुंभ राशी : कार्याची अधिकता राहील. नकोसे कार्य देखील करावे लागू शकतात. त्वरित धन कमावण्याच्या योजने मध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. पाहुण्यांचे आगमन होईल.

मीन राशी : शनीचे विक्री होणे लाभकारी होईल. व्यापारा मध्ये वाढ होईल, अनुशासन ठेवल्यास लाभ मिळेल. कुटुंबात समृद्धी राहील आणि परमेश्वरा बद्दल आस्था वाढेल. नवीन योजना आणि व्यापाराची सुरुवात होऊ शकते.


Show More

Related Articles

Back to top button