money

तुम्ही पाहिली का मारुतीची ७ सीटर ‘वॅगन आर’, येथे पहा…

भारतातील सवात लोकप्रिय कार मारुती सुझुकीची ‘वॅगन-आर’ नव्या स्वरुपात दाखल होतेय.

नवी ‘वॅगन-आर’ जुन्या वॅगन-आरच्या मॉडेल पेक्षा भरपूर वेगळी आहे. यामध्ये आधीच्या पेक्षा जास्त स्पेस आणि दमदार इंजिन असेल.

वॅगन-आर’चं ७ सीटर मॉडेल यावर्षी ऑगस्टमध्ये लॉन्च केलं जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे

नव्या ‘वॅगन-आर’ मध्ये १.२ लीटरचं ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे.  हे इंजिन ८४ bhp च्या पॉवर सोबत ११५nm टॉर्क जनरेट करतं.

५ स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन(AMT)दोन्ही ऑप्शन्समध्ये ही कार बाजारात उपलब्ध असेल. कंपनी नव्या ‘वॅगन-आर’सोबत सीएनजी ऑप्शन देण्याचाही विचार करू शकते

‘वॅगन-आर’ ३ वेरिएंटमध्ये लॉन्च होऊ शकते. या कारचे तीन वेरिएंट R बेस, R टॉप आणि R सीएनजी असू शकतात

कारमध्ये की लेस एन्ट्रीसोबतच सेंट्रल लॉकिंग, सिक्युरिटी अलार्म, ड्युएल टोन डॅशबोर्ड, ब्लूटूथसोबत डबल टिन स्टिरिओ, प्रीमिअम सीट फॅब्रिकसोबत रिअर पॉवर विंडो असेल. यामध्ये १४ इंच अलॉय व्हिल, रेग्युलर हॅलोजन हेडलॅम्पस आणि रुफ रेल्स असे फिचर्स असतील. नव्या गाडीत तीन रांगेत बसण्याची व्यवस्था असेल

या कारची सुरुवातीची किंमत ५.२ लाख रुपये असू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये R बेसची एक्स शोरुम किंमत ५.२ लाख रुपये, R टॉपची ६.५ लाख आणि R सीएनजीची किंमत ६.३ लाख रुपये असू शकेल


Tags
Show More

Related Articles

Back to top button