celebrities

या शस्त्राला लपवून ठेवतात Z+ सिक्योरिटी जवान, पहा कसे करतात काम

वीवीआईपी, वीआईपी, पॉलिटिसियंस, हाई-प्रोफाइल सेलिब्रिटी आणि स्पोर्ट्सपर्सन यांना काही एजेंसीज SPG (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप), NSG (नेशनल सिक्योरिटी गार्ड्स) आणि CRPF (सेंट्रल रिजर्व पुलिस फोर्स) सारख्या एजंसीज सिक्योरिटी प्रोवाइड करतात. ज्यास जेवढा धोका असतो त्यास तेवढी जास्त सिक्योरिटी टाइट दिली जाते. Z+ सिक्योरिटी बद्दल असे बोलले जाते की जेथे Z+ सिक्योरिटी असते तेथे “परिंदा भी पर नही मार सकता.” आज आम्ही अश्याच वेगवेगळ्या सिक्योरिटी बद्दल माहीती देत आहोत.

कोणत्या लोकांना मिळते सिक्योरिटी

प्रेसीडेंट, वॉइस प्रेसीडेंट, प्राइम मिनिस्टर, सुप्रीमकोर्ट, हाईकोर्ट चे जज, राज्याचे गवर्नर, चीफ मिनिस्टर, केबिनेट मिनिस्टर्स यांना सिक्योरिटी मिळते. चीफ मिनिस्टर्स आणि केबिनेट मिनिस्टर्स ऑटोमेटिकली सिक्योरिटी कवर मध्ये येतात. इंटेलीजेंस ब्यूरो (IB) चे अधिकारी, होम सेक्रेटरी आणि होम मिनिस्टर हे मिळून ठरवतात की कोणाला सिक्योरिटी दिली गेली पाहिजे आणि कोणाला नाही.

Z+ सिक्योरिटी

ही इंडिया मध्ये दिली जाणारी सर्वात हाईलेवल सिक्योरिटी आहे. यामध्ये 36 सुरक्षारक्षक तैनात असतात. 24 तास सुरक्षा दिली जाते. वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये मिळून 108 सुरक्षारक्षक असतात. यांच्याकडे अत्याधुनिक हत्यार असतात. सेमी ऑटोमेटिक पिस्टल असते जी एकावेळी 6 ते 20 राउंड फायर करू शकते.

ग्लोक नाइफ, जीपीएस, बुलेटप्रूफ जैकेट, हेलमेट सोबत एडवांस्ड गैजेट असतात. हे सुरक्षारक्षक मार्शल आर्ट मध्ये माहीर असतात. यामध्ये 28 नेशनल सिक्योरिटी गार्ड कमांडोज (NSG), एस्कॉर्ट, पायलट, कोबरा कमांडोज सोबत होम गार्ड्स शामिल असतात.

Z+ सिक्योरिटी मधल्या सुरक्षारक्षकांना त्याचे अत्याधुनिक पिस्टल लपवून ठेवण्याची ऑर्डर असते. कारण असे केल्यामुळे त्यांना कोणी आइडेंटिफाई करू शकणार नाहीत. ही पिस्टल आकाराने लहान असते.

X कैटेगरी

या कैटेगरी मध्ये बेसिक प्रोटेक्शन संबंधीत व्यक्तीला दिले जाते. या सिक्योरिटी मध्ये 2 सुरक्षारक्षक असतात. एक पर्सनल सिक्योरिटी ऑफिसर (PSO) असतो.

Y कैटेगरी

या कैटेगरी मध्ये 11 सुरक्षारक्षक असतात. यामध्ये दोन पर्सनल सिक्योरिटी ऑफिसर (PSO) असतो.

Z कैटेगरी

या हाईलेवल सिक्योरिटी मध्ये 22 सुरक्षारक्षक असतात. या सोबतच दिल्ली पुलिस आणि सीआरपीएफचे सुरक्षारक्षक तैनात असतात. यामध्ये 1 एस्कॉर्ट कार पण संबंधित व्यक्तिला दिली जाते.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : फक्त गव्हाच्या दाण्या एवढी ही वस्तू वाढवू शकते तुमची हाइट आणि स्पर्म काउंट, करावे लागेल हे


Show More

Related Articles

Back to top button