Connect with us

पॉकेट मनी असे युज करून नोकरी मिळण्या अगोदरच तुम्ही बनू शकता लखपती

People

पॉकेट मनी असे युज करून नोकरी मिळण्या अगोदरच तुम्ही बनू शकता लखपती

आपल्या पॉकेट मनीला चांगल्या प्रकारे मैनेज करून तुम्ही आपल्या करियरची सुरु होण्या अगोदरच 5 ते 8 लाख रुपये बनवू शकता.

आजकाल कॉलेजमध्ये जाणाऱ्या सर्व मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना 5-10 हजार रुपये पॉकेट मनी मिळतोच. या पॉकेट मनीचा एक हिस्सा गुंतवणूक करून तुम्ही येत्या 5 ते 7 वर्षात मोठा फंड बनवू शकता.

18 वर्षाच्या वयापासून जर तुम्ही आपल्या पॉकेट मनी मधून 3 हजार रुपये वाचवून प्रत्येक महिन्याला सिस्‍टमैटिक इंवेस्‍टमेंट प्‍लानिंगने 7 वर्ष गुंतवणूक केली तर तुम्हाला भरपूर फायदा होईल. यासाठी तुम्हाला प्रत्येक वर्षी आपली गुंतवणूक 10 टक्क्याने वाढवावी लागेल. जर गुंतवणुकीवर 12 टक्के वार्षिक रिटर्न मिळत असेल तर तुमचा रिटर्न जवळजवळ 5 लाख रुपये होईल.

साधारण पणे ग्रेजुएशन नंतर लोक पोस्ट ग्रेजुएशन करतात आणि मग इंटर्नशिपचा नंबर येतो. यानंतर 25 वर्षाच्या वयात प्रोफेशनल करियरची सुरुवात होते. अश्या पद्धतीने जर तुम्ही प्रोफेशनल करियरची सुरुवात करत असाल तर तेव्हा तुम्ही तुमच्या पैश्याने एक कार खरेदी करू शकाल.

जर तुम्ही कार खरेदी करण्याची इच्छुक नसाल तर तुम्ही एसआईपी मध्ये आपली गुंतवणूक सुरु ठेवू शकता. एसआईपी सुरु ठेवल्यामुळे तुम्हाला कमी वयातच कंपाउंडिंगचा फायदा मिळेल. कंपाउंडिंगचा फायदा 10 वर्षा नंतर दिसण्यास सुरुवात होते आणि तुमचा फंड गतीने वाढायला लागतो. याप्रकारे तुम्ही कमी वयातच आपल्या पैश्यांना योग्य जागी गुंतवणूक करून आपले भविष्य सुरक्षित करून मोठा फंड जमा करू शकता.

जर तुम्ही कॉलेज लाईफ नंतर आपले स्वताचे स्टार्ट अप किंवा बिजनेस सुरु करण्याच्या विचारात असाल तर हा पैसा तुम्हाला त्या कामी उपयोगी येऊ शकतो. हे पैसे असल्यामुळे तुम्हाला आपला बिजनेस सुरु करण्यासाठी किंवा आपल्या गरजेसाठी कोणाकडेही पैसे मागण्याची गरज पडणार नाही.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top