बचत खात्या वर FD चे व्याज कधी ऐकले आहे? ही बँक देत आहे सुविधा, अजूनही अनेक फायदे

SBI Savings Plus Account: एसबीआई (State Bank of India-SBI) ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सगळ्यात मोठी बैंक मानली जाते. त्यामुळे सर्वाधिक Bank Account देखील याच बैंकेत आहेत. SBI आपल्या बचत खात्यावर (Saving Account) वर 2.70 टक्के व्याज (Intrest rate) देते.

पण तुम्ही कधी अशा कोणत्याही बचत खात्याबद्दल ऐकले आहे ज्यावर तुम्हाला FD चे व्याजदर मिळू शकतील? SBI Savings Plus Account मध्ये तुम्हाला ही सुविधा देण्यात आली आहे. या खात्यात तुम्हाला FD प्रमाणे व्याज मिळू शकते. या खात्या बद्दल अधिक जाणून घेऊ.

SBI Savings Plus Account FD intrest rate on saving account

FD चा फायदा कसा मिळवायचा ते जाणून घ्या

खरंतर SBI च्या या खात्यात ऑटो स्वीप सुविधेचा (Auto Sweep Facility) लाभ उपलब्ध आहे. ऑटो स्वीप सुविधेमध्ये, बचत खात्यातील शिल्लक एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असल्यास, जास्तीची रक्कम आपोआप FD मध्ये रूपांतरित केली जाते.

तुम्हाला FD मध्ये रूपांतरित केलेल्या रकमेवर FD चे व्याज आणि उर्वरित शिल्लक रकमेवर बचत खात्याचे व्याज मिळते. SBI च्या सेव्हिंग प्लस खात्यातील किमान शिल्लक मर्यादा 35,000 रुपये आहे. जर रक्कम 35,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुमचे पैसे फिक्‍स्‍ड डिपॉजिट (Fixed deposit) मध्ये कन्‍वर्ट केले जातात.

टर्म पीरियड कालावधी 1 ते 5 वर्षे

एसबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, सेविंग्‍स प्‍लस अकाउंट टर्म पीरियड कालावधी 1 ते 5 वर्षांपर्यंत असतो. या दरम्यान, तुम्ही त्यात जितकी जास्त रक्कम जमा कराल तितके जास्त व्याज तुम्हाला वेळ पूर्ण झाल्यानंतर मिळेल. हे खाते मल्टी ऑप्शन डिपॉझिट (MOD) शी लिंक केलेले आहे.

SBI Savings Plus Account वैशिष्ट्ये

  • हे अकाउंट कोणीही उघडू शकते. जॉइंट अकाउंट उघडण्याचीही सोय आहे.
  • या अकाउंट सह तुम्हाला 25 पानांचे चेकबुक मिळते. तसेच, तुम्ही 1000 ते 10,000 रुपयांच्या पटीत पैसे ट्रान्सफर करू शकता.
  • यामध्ये ऑटो स्‍वीप फैसिलिटी अंतर्गत एफडीचा कालावधी 1 वर्षापासून 5 वर्षांपर्यंत ठेवता येईल.
  • मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग या सुविधांसोबतच तुम्हाला एटीएमची सुविधाही दिली जाते.
  • जर तुम्हाला MOD वर कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही त्यासाठी देखील अर्ज करू शकता.

अश्या प्रकारे तुम्ही SBI Savings Plus Account मध्ये FD चे व्याज दर मिळवू शकता.

Follow us on

Sharing Is Caring: