वरुण धवन चा ‘कुली नंबर 1’ मधला नवीन लुक समोर आला, सारा अली खान ने फोटो शेयर केला

0
12

वरुण धवन सध्या आपल्या आगामी फिल्म ‘कुली नंबर 1’ च्या तयारी मध्ये व्यस्त आहे. फिल्म मध्ये वरुण सोबत सारा अली खान देखील मुख्य भूमिके मध्ये असणार आहे. वरुण धवन याचा या फिल्म मधला लूक सारा अली खान ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेयर केला आहे.

सारा अली खान ने आपल्या अकाउंट वरून एक फोटो शेयर केला आहे ज्यामध्ये वरुण कुलीच्या लूक मध्ये दिसून येत आहे. फोटो शेयर करताना सारा ने लिहिले आहे ‘कूल और कुली’

 

View this post on Instagram

 

Cool and Coolie💁🏻‍♀️🙆🏽‍♂️🧳👜👫🌈

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

‘कुली नंबर 1’ ही फिल्म डेविड धवन डायरेक्ट करत आहेत. ही फिल्म गोविंदा अभिनित ‘कुली नंबर 1’ चा रिमेक आहे. वरुण धवन आणि डेविड धवन या फिल्मच्या रिमेकवर काम करत आहेत. या व्हर्जन मध्ये गोविंदाची भूमिका वरुण धवन करणार आहे तर करिष्मा कपूरची भूमिका सारा अली खान करणार आहे.

‘कुली नंबर 1’ हा चित्रपट गोविदा आणि डेविड धवन यांच्या जोडगोळी ने बॉलिवूडला दिलेल्या उत्तम चित्रपटा पैकी एक आहे. या फिल्म मध्ये गोविंदा, करिष्मा कपूर आणि कादर खान, शक्ती कपूर यांनी उत्तम अभिनय करून प्रेक्षकांना भरपूर हसवले होते. या फिल्मचा रिमेक बनत आहे

नवीन बनत असलेल्या ‘कुली नंबर 1’ मध्ये गोविंदा आणि करिष्मा कपूरची भूमिका कोण करणार हे समजले असले तरी कादर खान आणि शक्ती कपूर यांची भूमिका कोणते कलाकार करणार हे देखील पाहणे महत्वाचे आहे. कारण कादर खान, शक्ती कपूर यांच्या देखील भूमिका महत्वाच्या होत्या.

या फिल्म मध्ये सारा आणि वरुण सोबत शिखा तलसानिया देखील असणार आहे परंतु ती कोणत्या भूमिकेत असेल हे समजू शकले नाही. शिखा या अगोदर सोनम कपूर आणि करीना कपूर सोबत वीरे दी वेडिंग मध्ये दिसली होती.