सलमान खानचे हे 5 सुपरडुपर हिट चित्रपट खरंतर आहेत साउथ चित्रपटांचे रिमेक, जाणून घ्या कोणते आहेत हे चित्रपट

जर तुम्ही साऊथच्या चित्रपटांचे चाहते असाल तर तुम्हाला माहीत असेलच कि बॉलिवूड मध्ये अनेक सुपरहिट चित्रपट असे आहेत जे मूळचे साऊथच्या भाषेतील आहेत पण त्यांचा हिंदी मध्ये रिमेक करून त्यांना हिंदी मध्ये सुपरहिट केले गेले आहे. या मध्ये सलमान खानचे काही चित्रपट आहेत जे साऊथ चित्रपटांचे रिमेक आहेत आणि ते हिंदी मध्ये देखील सुपरहिट झाले आहेत. चला जाणून घेऊ कोणते आहेत हे चित्रपट.

सलमान खानच्या करिअरला पुन्हा नवी उभारी देणारा चित्रपट होता 2003 मध्ये सतीश कौशिक यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘तेरे नाम’. या चित्रपटा मधली सलमान खानची हेअर स्टाईल त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झाली होती. तसेच या चित्रपटाला यशस्वी होण्यामागे या चित्रपटाची सुपरहिट गाणी देखील तेवढीच महत्वाची होती. पण तुम्हाला कदाचित समजल्यावर आश्चर्य वाटेल कि मुळात हा चित्रपट तमिळ चित्रपट ‘सेतू’ या हिंदी रिमेक आहे. ‘सेतू’ हा चित्रपट 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता.

सलमान खानचा दुसरा सुपरहिट चित्रपट जो आजही आपल्या पैकी अनेक लोक आपल्या रिकाम्या वेळात पाहत असतील तो म्हणजे ‘वॉन्टेड’ हा चित्रपट. हा मूळचा तेलगू मधील सुपरहिट चित्रपट ‘पोकिरी’ चा हिंदी रिमेक आहे. ‘वॉन्टेड’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवाने केले होते.

सलमान खान आणि आसिनचा सुपरहिट कॉमेडी चित्रपट ‘रेडी’ हा देखील तेलगू मधील ‘रेडी’ या चित्रपटाचा हिंदी मधील रिमेक आहे. या चित्रपटातील कॉमेडी सोबतच या चित्रपटाची गाणी देखील तेवढीच लोकांच्या पसंतीस आले होते.

सलमान खान आणि करीना कपूर यांचा 2011 मध्ये प्रदर्शित सुपरहिट चित्रपट ‘बॉडीगार्ड’ हा चित्रपट देखील मूळचा मल्याळम चित्रपट ‘बॉडीगार्ड’ चा हिंदी मधील रिमेक आहे. सलमान आणि करीनाचा हा चित्रपट देखील सुपरहिट झाला होता.

साजिद नाडियादवाला ने दिग्दर्शित केलेला सुपरहिट चित्रपट ‘किक’ हा 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि सुपरहिट झाला होता. या चित्रपटा मध्ये सलमान खान सोबत जॅकलिन फर्नांडिज ही मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट देखील मूळचा तेलगू चित्रपट ज्याचे नाव देखील ‘किक’ होते याचा हिंदी मधील रिमेक आहे.