Uncategorized

Rose Water and Glycerin Benefits for Skin in Marathi

Rose Water and Glycerin Benefits for Skin in Marathi : जवळपास सगळ्याना माहित आहे कि गुलाबजल आणि ग्लिसरीन चेहऱ्याच्या त्वचेसाठी किती फायदेशीर आहे. परंतु तरी देखील अतिशय कमी लोक दोन्ही वस्तूंच्या मिश्रणा पासून मिळणारे फायदे घेणे जाणतात. या मिश्रणाचा फायदा चेहऱ्याच्या त्वचेवर थंडी मध्ये आणि उन्हाळ्यात जास्त होतो. कारण दोन्ही काळात त्वचा एकतर तेलकट असते किंवा कोरडी असते. चला आपण गुलाबजल आणि ग्लिसरीन यांच्या मिश्रणाचे फायदे आणि ते कसे वापरावे हे पाहू.

गुलाबजल हि अशी वस्तू आहे जी जवळपास प्रत्येक ब्युटी प्रोडक्ट मध्ये असते. सौंदर्य वाढवण्यासाठी थंडी मध्ये गुलाबाचा वापर होतो. गुलाबजल सतत लावल्यामुळे त्वचेच्या संबंधित अनेक समस्या दूर होतात आणि चेहरा टवटवीत होतो. पुरुष गुलाबजल अफ्तर शेव म्हणून देखील वापरू शकतात. गुलाबाच्या पाकळ्या चेहऱ्यावर चोळल्याने चेहऱ्यावर थंडावा आणि फ्रेशनेस येते.

चेहरा गोरा करण्यासाठी उपाय : BEAUTY TIPS IN MARATHI

गुलाबजल आणि ग्लिसरीन यांच्या मिश्रणाचे फायदे

  • गुलाबजल आणि ग्लिसरीन यांना एकत्र करून चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होऊन त्वचा टवटवीत होण्यास मदत होते. हा उपाय रात्री झोपण्याच्या अगोदर पाच मिनिट करावा.
  • गुलाबजल आणि ग्लिसरीन यांचे मिश्रण आठवड्यातून दोन वेळा त्वचेवर लावल्याने त्वचेच्या कोशिकांमध्ये नवीन ताजेपणा येतो. आणि त्वचेच्या छिद्रामध्ये जमा होणारी घाण सहज चोळल्याने बाहेर निघून येते.
  • हे मिश्रण चेहऱ्यावर हलक्या हाताने चोळल्यामुळे चेहऱ्यामध्ये रक्तसंचार होण्यास मदत मिळते कारण यामध्ये एन्टी एजिंग गुण असतात. जे चेहऱ्यावर सुरुकुत्या पडण्या पासून वाचवते. त्यामुळे चेहरा वयाच्या तुलनेत तरुण आणि सुंदर दिसतो.
  • त्वचेचा ढिलेपणा आणि कोरडेपणा दूर करण्यासाठी गुलाबजल आणि ग्लिसरीन समान प्रमाणात घेऊन लावल्याने हे औषधा प्रमाणे कार्य करते. यामुळे चेहऱ्यावर टवटवीत पणा येतो आणि त्वचेवरील दाग दूर होतात.

Rose Water and Glycerin Benefits for Skin in Marathi

  • चेहऱ्यावर मुरुमांच्यामुळे होणारे दाग होऊ देत नाही. आठवड्यातून दोन वेळा रात्री हलक्या हाताने पाच मिनिट मालिश केल्याने फायदा होतो.
  • एका बाटली मध्ये ग्लिसरीन, लिंबूरस आणि गुलाबजल सम प्रमाणात घ्या. रात्री झोपण्यापूर्वी दोन थेंब चेहऱ्यावर लावा. काही दिवसातच चेहऱ्यावर चमक येईल.
  • जर तुम्ही प्रखर सूर्यप्रकाशात बाहेर फिरत असाल तर चेहऱ्यावर गुलाबजल लावा यामुळे सूर्यप्रकाशाचा त्रास कमी होईल. दीर्घकाळ सूर्यप्रकाशात राहिल्यामुळे चेहरा काळा पडतो. रोज सकाळी चेहरा धुतल्यानंतर एक चमचा गुलाब जल मध्ये लिंबाचे काही थेंब रस टाकून हलक्या हाताने लावा आणि नंतर चेहरा धुवा. यामुळे त्वचेचा काळेपणा कमी होईल.
  • कॉम्प्युटरवर काम केल्यामुळे आपले डोळे थकल्या सारखे होतात. अनेक वेळा डोळे दुखतात देखील किंवा जळजळ होते. अश्यात उपाय म्हणून एक किंवा दोन थेंब गुलाबजल टाका. यामुळे डोळ्यांना ओलावा आणि थंडावा मिळेल ज्यामुळे डोळ्यांची जळजळ दूर होईल.
  • त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी गुलाबजल सर्वोत्तम आहे. यासाठी हे टोनर म्हणून वापरले जाते. दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर गुलाबजल चेहऱ्यावर लावा. काही दिवस याचा वापर केल्याने चेहऱ्याची त्वचा टाईट होईल.

तुम्हाला Rose Water and Glycerin Benefits for Skin in Marathi आणि How to use आता समजले असेलच जर तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर आपल्या फेसबुक वर ही माहिती शेयर करा. ज्यामुळे तुमच्या मित्रांना देखील याची माहिती होईल.

Tags

Related Articles

Back to top button