Uncategorized

डार्क सर्कल रातोरात दूर करण्यासाठी करा हे उपाय

डार्क सर्कल म्हणजेच डोळ्याच्या खालील काळे वर्तुळ कोणाच्याही सुंदरते मध्ये कमी आणू शकतात. बहुतेक वेळा डार्क सर्कल वाढण्याचे कारण अनुवांशिक मानले जाते, जे जसजसे वय वाढते तसे वाढत जातात. पण हे आवश्यक नाही कि डार्क सर्कल वय वाढल्यामुळेच होतात. हे प्रदूषण, धुम्रपान, झोपेची कमी, सकस आहाराची कमी किंवा इतर कारणांमुळे देखील होऊ शकतात.

पण, योग्य काळजी घेतली तर रातोरात डार्क सर्कल पासून सुटका मिळवणे शक्य आहे. आजकाल अनेक कॉस्मेटिक उत्पादने आहे जे एका दिवसात डार्क सर्कल दूर करण्याचा दावा करतात. परंतु पुढे जाऊन यांचे साईड इफेक्ट्स देखील होऊ शकतात.

यासाठी डार्क सर्कल दूर करण्यासाठी नैसर्गिक उपाय करणे नेहमी चांगले असते. या आर्टिकल मध्ये आम्ही अश्याच काही नैसर्गिक उपाया बद्दल माहिती देत आहोत. ज्यांच्या मदतीने रातोरात डार्क सर्कल पासून सुटका मिळवणे शक्य आहे.

काकडीचे स्लाइस (तुकडे)

काकडी मध्ये एस्ट्रिजेंट गुण असतात जे सहज आणि प्रभावी पणे डोळ्यांच्या खालील काळे वर्तुळ दूर करण्यास मदत करतात.

1. यास सोप्प्या पद्धतीने वापरण्यासाठी काकडीला जवळपास 30 मिनिट फ्रीज मध्ये थंड होण्यासाठी ठेवा.

2. यानंतर काकडीचे स्लाईस करून डोळ्यावर ठेवा आणि जवळपास 20 मिनिट तसेच ठेवा.

यामुळे फक्त डार्क सर्कल दूर होण्यास मदत होण्या सोबतच डोळ्याच्या खालील सूज देखील कमी होते.

गुलाब जल

गुलाब जल सौंदर्य वाढवण्यासाठी किती उपयोगी आहे हे जवळपास सगळ्यांना माहित आहे आणि गुलाब जल स्कीन स्वच्छ करण्यासाठी वापरणे आणि स्कीनचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. डोळ्यासाठी आणि डार्क सर्कल दूर करण्यासाठी देखील गुलाब जल प्रभावी ठरते.

1. सर्वात पहिले 2 मोठे चमचे गुलाब जल घ्या आणि यामध्ये काही मिनिट कापसाचे बोळे भिजत ठेवा.

2. यानंतर डोळे बंद करा आणि गुलाब जलामध्ये भिजलेले कापसाचे बोळे डोळ्यावर ठेवा.

3. यास 15 मिनिट डोळ्यावर तसेच ठेवा आणि नंतर नॉर्मल पाण्याने धुवून घ्या.

दुध

दुध त्वचेला मॉईस्चराइज करण्यास मदत करतो कारण यामध्ये लैक्टिक एसिड असते. यामुळे हे नैसर्गिक पणे डोळ्याच्या खालील डार्क सर्कल आणि सूज कमी करण्यासाठी मदत करतो. यासाठी तुम्हाला फक्त थंड दुधाची आवश्यकता आहे.

1. थंड दुधा मध्ये कापसाचे बोळे भिजत ठेवा आणि यांना डोळ्याच्या खाली ठेवा. असे जवळपास 15 मिनिट डोळ्यावर राहू द्या.

2. लवकर परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही हा उपाय दिवसातून दोन ते तीन वेळा करू शकता.

3. तुम्ही हा उपाय जेवढा जास्त कराल तेवढा लवकर डोळ्या खालील काळे वर्तुळ दूर होतील.

लिंबाचा रस

लिंबाचा रस डेड स्कीन काढण्यासाठी आणि त्वचा चमकदार करण्यासाठी मदत करतो.

1. कापसाच्या मदतीने डोळ्या खाली लिंबाचा रस डोळ्याच्या खाली लावा.

2. यास 10 मिनिट तसेच राहू द्या आणि नंतर नॉर्मल पाण्याने धुवू घ्या.

3. तुम्ही हा उपाय दिवसातून दोन वेळा करू शकता. सकाळी आणि रात्री करू शकता.

एलोवेरा जेल

एलोवेरा जेल त्वचेला हाइड्रेट करण्यासाठी आणि पोषण देण्यासाठी प्रभावी आहे.

1. एक ताजा एलोवेरा चे पान घेऊन यामधून जेल बाहेर काढा.

2. तुम्ही बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या एलोवेरा जेलचा देखील वापर करू शकता.

3. आपल्या डोळ्याखाली एलोवेरा जेल लावा आणि हळूहळू मालिश करा.

4. यानंतर यास 10-15 मिनिट तसेच राहू द्या.

5. 10 मिनिटानंतर यास कापसाच्या मदतीन स्वच्छ करा.

ग्रीन टी बैग्स

ग्रीन टी बैग तुमच्या डोळ्या खालील काळे वर्तुळ कमी करण्यासाठी मदत करू शकतात कारण यामध्ये असलेले गुण तुमचे डोळे रिफ्रेश करतात आणि डार्क सर्कल दूर करण्यास मदत करतात.

1. तुम्हाला केवळ दोन ग्रीन टी बैगची गरज आहे.

2. टी-बैग पाण्यात बुडवा आणि 30 मिनिट फ्रीज मध्ये थंड होण्यासाठी ठेवा.

3. यानंतर थंड टी बैग आपल्या डोळ्यावर ठेवा आणि 15 मिनिट तसेच राहू द्या.

4. यानंतर आपल्या डोळ्यांना नॉर्मल पाण्याने धुवा. हा उपाय तुम्ही दिवसातून एकदा करू शकता.

मध

मध त्वचेला पोषण देण्या सोबतच त्यास नरम बनवते.

1. डोळ्याच्या खाली मध लावा आणि यास वीस मिनिट तसेच ठेवा.

2. यानंतर नॉर्मल पाण्याने धुवा आणि कोरडे होऊ द्या.

3. चांगल्या आणि उत्तम परिणामासाठी दररोज हा उपाय दोन वेळा करु शकता.

Tags

Related Articles

Back to top button