प्रेमात बुडालेल्या रवीनाने केला होता स्वतःला संपवण्याचा प्रयत्न, या अभिनेत्याने दिली होती धमकी

90 च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री रवीना टंडन ने 26 ऑक्टोबर रोजी आपला 45 वा वाढदिवस साजरा केला. रविना टंडन जरी 45 वर्षांची झाली असली तरी तिचे सौंदर्य अजूनही थोडेसे देखील कमी झाले आहे असे वाटत नाही. रवीना टंडन चे आजही मोठे फैन फॉलोईंग आहे. तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर राष्ट्रीय पुरस्कार देखील जिंकला आहे. रवीना ने बॉलिवूड मध्ये जवळपास आपले 27 वर्षाचे करियर पूर्ण केले आहे.

रवीना आपलं वैवाहीक जीवन आनंदाने जगत आहे. पण रवीनाच्या आयुष्यात देखील एक काळ असा आला होता की तेव्हा तिच्या आयुष्यात अनेक अडचणी उभ्या राहिल्या होत्या. सुरुवातीला रवीनाचे नाव अजय देवगण सोबत जोडलं गेलं होतं आणि रवीना देखील अजयच्या प्रेमात बुडाली होती, तसेच तिने त्याच्यासाठी स्वताला संपवण्याचा प्रयत्न केला होता.

आता अजय देवगण आणि काजोल आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी असले तरी एकेकाळ असा होता कि अजय ज्या चित्रपटामध्ये काम करायचा त्याच्या अभिनेत्री सोबत अफेयर असल्याची चर्चा होत असे. तो ज्या अभिनेत्री बरोबर काम करायचा ती अभिनेत्री त्याच्या प्रेमात पडत असे. त्यामध्ये रवीना टंडन देखील होती.

अजय आणि रवीना यांचा हा किस्सा दिलवाले फिल्मच्या वेळेचा आहे. त्यावेळी रवीना टंडन अजयच्या प्रेमात होती. त्यावेळी अजय आणि रवीना यांच्या अफेयरच्या चर्चा मीडियात होत होती. पण त्याच वेळी अजय दुसरा चित्रपट करत होता त्याचे नाव जिगर होते त्यामध्ये अजयची अभिनेत्री होती करिष्मा कपूर. या फिल्मच्या शूटिंगच्या वेळी अजय आणि करिष्माच्या अफेयरची चर्चा सुरु झाली.

यासगळ्या प्रकाराने रवीना डिप्रेशन मध्ये गेली आणि एवढंच नाही तर तीने स्वताला संपवण्याचा प्रयत्न देखील केला होता. पण अजय ने यावर प्रतिक्रिया देतांना हा रवीनाचा पब्लिसिटी स्टंट असल्याचे सांगितलं होत. प्रकाशझोतात राहण्यासाठी ती हे करत आहे असे अजय चे म्हणणे होते.

अजयच्या या प्रतिक्रिये नंतर रवीना ने सांगितलं कि अजय ने तिला लव्ह लेटर लिहिली आहेत आणि अजय तिला फसवत आहे. त्यांनतर अजय ने रवीनाला मानसोपचार तज्ज्ञाची गरज असल्याचं म्हंटल होत. तसेच रविना कधीच माझी मैत्रीण नव्हती आणि मी कधीही तिच्यावर प्रेम केलं नाही. ती सगळं हे इमॅजिन करत आहे. असे अजय म्हणाला होता. अजय अनुसार रवीना ने माझ्या नावाने स्वतालाच पत्र लिहिले.

या सगळ्या नंतर अजय ने रवीनाला चैलेंज दिले कि तिच्यात हिम्मत असेल तर तिने सगळी पत्रे पब्लिश करावीत. तसेच अजय ने धमकी दिली कि तिने माझ्यावर असे आरोप लावणे बंद नाही केले तर मी तिचे अशी काही गुपितं उघड करेल ज्यानंतर ती कोठेही तोंड दाखवू शकणार नाही. यानंतर रवीनाला अक्षय कुमार सोबत मोहरा फिल्म भेटली आणि रवीनाचे अक्षय सोबत नाते जुळले पण हे नाते दीर्घकाळ टिकू शकलं नाही.