astrology

राशिभविष्य 24 में 2018 : पहा कोणाचे नशीब देईल आज साथ आणि कोणास करावे लागतील जास्त प्रयत्न

राशीभविष्य आपल्या जीवना मध्ये महत्वाचे आहे. राशी अनुसार व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याच्या निगडीत अनेक माहिती प्राप्त होऊ शकते. ग्रह गोचर आणि नक्षत्र चाल यांच्या आधारावर राशिभविष्य निर्माण होते. ग्रहांची चाल नेहमी बदलत असते. यामुळे आपल्या दैनिक जीवनात घडणाऱ्या घटना देखील एकसारख्या नसतात. आज मंगळवार 22 में चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Thursday, May 24, 2018)

जुन्या मित्रांबरोबरील भेटीगाठी तुमचा उत्साह द्विगुणित करतील. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. तुमच्या दुराग्रही स्वभावामुळे तुमच्या पालकांची शांती तुम्ही भंग कराल. त्यांच्या सल्ल्याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. दुखावले जाण्यापेक्षा त्यांच्या आज्ञांचे पालन करा. तुमचे प्रियकर/प्रेयसी यांच्यावर तुम्ही हुकूमशाहीने गाजवू पाहाल तर खूप गंभीर समस्या उद्भवेल. तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांतपणे काम करा आणि तुम्ही त्यात यशस्वी होईपर्यंत तुमच्या हेतूबद्दल कुणाला काही सांगू नका. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुमचा/तुमची जोडीदार तुमची गरज भागवू शकणार नाही, त्यामुळे तुमची चिडचिड होईल.

वृषभ राशी भविष्य (Thursday, May 24, 2018)

सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. नवीन गुंतवणूक करताना स्वतंत्रपणे विचार करुन निर्णय घ्या. तुम्ही प्रेमात पोळून निघालात तरी हळूहळू प्रेम मिळविण्यात यशस्वी व्हाल. भागीदारीतील प्रकल्पातून सकारात्मक फळ मिळण्यापेक्षा अनेक प्रश्न निर्माण होतील. दुस-यांना आपल्या स्वभावाचा फायदा घेऊ दिल्याबद्दल तुम्ही स्वत:वर विशेष रागावलेले असाल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुमच्यावरील तणाव वाढेल.

मिथुन राशी भविष्य (Thursday, May 24, 2018)

आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. प्रलंबित घटना,वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल.. कौटुंबिक जबाबदा-या बंधनांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. दरदिवशी कोणाच्यातरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. काहीजणांना अर्ध-वेळ कामं मिळतील.. तुम्ही अवचित काही चुकीचे बोलाल किंवा कृती कराल तर अधिकारी व्यक्ती तुम्हाला समजून घेणार नाहीत. किराणा मालाच्या खरेदीवरून तुम्ही तुमच्या जोडीदारावर चिडाल.

कर्क राशी भविष्य (Thursday, May 24, 2018)

आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि कुटुंबियांच्या भावना समजून घ्या. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवणे त्रासाचे ठरेल – परंतु तुमच्या आजुबाजूच्या लोकांना टाकून बोलू नका किंवा तुम्ही एकटे पडाल. एखाद्याची योग्य माहिती आणि एकमेकाला समजून घेतल्यानंतरच मैत्री करा. व्यवसायातील आपल्या कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता आहे. अपेक्षित फळासाठी तुम्ही तुमचे सारे लक्ष प्रयत्नावर केंद्रित करावे. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठावठिकाणा ठेवणार नाहीत. वैवाहिक आयुष्यात बऱ्याच मागण्या पूर्ण कराव्या लागतात, तुम्ही जर त्या पूर्ण केल्या नाहीत तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे सतर्क राहा.

सिंह राशी भविष्य (Thursday, May 24, 2018)

अमर्याद ऊर्जा आणि उत्साह तुमच्यात सतत सळसळत राहील. त्यामुळेच मिळालेल्या प्रत्येक संधीचा तुम्ही योग्य फायदा घेऊ शकाल. चांगली गुंतवणूक फक्त परतावा मिळवून देतील – त्यामुळे तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले, की मग बाकी कशाचीच गरज उरणार नाही. तुम्हाला आज या सत्याचा उलगडा होईल. आज तुमचा प्रतिस्पर्धी तुम्हाला चुकीचे ठरविण्यासाठी सरसावेल. प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल. तुमच्या जोडीदारासमवेत हा एक सुंदर दिवस असणार आहे.

कन्या राशी भविष्य (Thursday, May 24, 2018)

कुटुंबातील सदस्यांशी तुमच्या अयोग्य वागणुकीमुळे वातावरण बिघडून जाईल. तुम्हाला इतरांकडून जशी वागणूक मिळणे अपेक्षित आहे त्याच पद्धतीने तुम्ही इतरांशी वागले पाहिजे. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. कुटुंबातील सदस्यांना मदत करणे आणि तुमचे छंद जोपासणे यासाठी वेळ खर्च कराल. प्रेमातील चैतन्य आज एकदम खालच्या पातळीवर असेल. स्पर्धात्मक परीक्षेला बसणाºयांनी शांत मनाने सामोरे जावे. परीक्षेच्या भीतीमुळे ग्रासून जाऊ नका. तुमचे प्रयत्न तुम्हाला निश्चितपणे सकारात्मक निकाल मिळवून देतील. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या आनंदाला धक्का पोहोचविण्याची शक्यता आहे.

तुल राशी भविष्य (Thursday, May 24, 2018)

तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे – परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. धार्मिक स्थळी किंवा एखाद्या संतसदृश माणसाला भेटून तुम्हाला मन:शांती मिळेल. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे कारण तुमचे प्रियकर/प्रेयसी अंदाज लावता येणार नाही अशा मूडमध्ये आहेत. तुम्हाला कामाच्या ठिकाणी आज खास वाटेल. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. तुमचे वैवाहिक आयुष्य चुकीच्या पद्धतीने तुमचे शेजारी तुमचे कुटुंबिय आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवतील.

वृश्चिक राशी भविष्य (Thursday, May 24, 2018)

स्वत:ला चुस्त तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरी आहार टाळा. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. शाळेत मुलांना अभ्यासात रुची नसल्यामुळे त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला निराशा देणारे आहे. पाहताक्षणी तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल.

धनु राशी भविष्य (Thursday, May 24, 2018)

तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित असाल – म्हणून तुम्ही दुखावले जाल अशा परिस्थिती-प्रसंगांपासून दूर राहा, सावध राहा. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. नातेवाईक तुमच्यासाठी अनपेक्षित भेटवस्तू आणतील पण तुमच्याकडूनही काही मदतीची अपेक्षा ठेवतील. अचानक प्रणयाराधन करायला मिळाल्याने तुम्ही गोंधळून जाल. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध असा, हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या टीनएजमध्ये जाल, आणि त्यावेळी जी मजा केली होती, तिची उजळणी करून पुन्हा त्याचा अनुभव घ्याल.

मकर राशी भविष्य (Thursday, May 24, 2018)

आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. गुंतवणूक अतिशय काळजीपूर्वक करावी. कारण नसताना नुकसान होऊ नये यासाठी योग्य सल्ला घेणे चांगले. मित्र परिवार आणि नातेवाईक तुमच्या अधिक अपेक्षा धरतील, पण हीच वेळ आहे, तुम्ही तुमची सर्व दारं जगासाठी बंद करून स्वत:ला राजेशाही वागणूक द्या. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार प्रेमसागरात डुबकी मारणार आहात आणि प्रेमाच्या अत्युच्च अानंदाचा अनुभव घेणार आहात. तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत केलेत तर यश आणि मान्यता दोन्ही तुमच्याकडे चालत येईल. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. सातत्याने विविध गोष्टींवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढून त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण पडेल.

कुम्भ राशी भविष्य (Thursday, May 24, 2018)

उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नका, त्याने आजारी पडायची शक्यता अधिक आहे. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. घरात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा. जुजबी मतभेद झाल्याने प्रणयराधनाचा योग नाही. तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांतपणे काम करा आणि तुम्ही त्यात यशस्वी होईपर्यंत तुमच्या हेतूबद्दल कुणाला काही सांगू नका. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाशी असलेल्या भावनिक नात्याबद्दलच संशय निर्माण होईल, जे चुकीचे आहे.

मीन राशी भविष्य (Thursday, May 24, 2018)

आज तुमची प्रकृती चांगली राहील. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. परंतु, तुमचे सामथ्र्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रणींना घेऊ देऊ नका. पराभव, अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. तुमच्या कार्यालयीन कामामध्ये आज बरेच अडथळे निर्माण होतील. जे स्वत:ला मदत करतात त्यांनाच देवही मदत करतो हे विसरून चालणार नाही. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल, ज्यामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल.


Show More

Related Articles

Back to top button