Connect with us

राशिभविष्य 18 में 2018 : आज या 3 राशींना मिळणार मोठी खुशखबर, आणि हे होतील त्रस्त, क्लिक करून पहा

Astrology

राशिभविष्य 18 में 2018 : आज या 3 राशींना मिळणार मोठी खुशखबर, आणि हे होतील त्रस्त, क्लिक करून पहा

राशीभविष्य आपल्या जीवना मध्ये महत्वाचे आहे. राशी अनुसार व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याच्या निगडीत अनेक माहिती प्राप्त होऊ शकते. ग्रह गोचर आणि नक्षत्र चाल यांच्या आधारावर राशिभविष्य निर्माण होते. ग्रहांची चाल नेहमी बदलत असते. यामुळे आपल्या दैनिक जीवनात घडणाऱ्या घटना देखील एकसारख्या नसतात. आज शुक्रवार 18 में चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Friday, May 18, 2018)

सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. गुंतवणूक अतिशय काळजीपूर्वक करावी. कारण नसताना नुकसान होऊ नये यासाठी योग्य सल्ला घेणे चांगले. मुलांसोबतच्या वादातून मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. – एका मर्यादेनंतर स्वत:ला त्रास करुन घेऊ नका, काही गोष्टींच्या वाटेला न जाणेच श्रेयस्कर असते. आजच्या दिवशी प्रेम प्रकरणात मतभेद निर्माण होऊन वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. कामाच्या ताणतणावांचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल, आणि तो/ती याबाबतचा रोष संध्याकाळी बोलून दाखवेल.

वृषभ राशी भविष्य (Friday, May 18, 2018)

अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे तुमचा दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खातील. चुकीचा निरोप गेल्यामुळे किंवा चुकीच्या संवाद साधण्यामुळे तुमचा दिवस खराब जाऊ शकतो. कामाच्या ठिकाणची परिस्थिती काहीशी विचित्र असू शकेल; सर्वजण तुमच्या विरुद्ध आहेत, असे तुम्हाला वाटू शकेल. असे वाटत असले तरी ते खरे नाही. नव्या कल्पनांची परिक्षा घेण्यासाठी योग्य दिवस आहे. तुमच्या दोघांमध्ये होणाऱ्या बाहेरच्यांच्या ढवळाढवळीमुळे तुमच्या नात्यावर दुष्परिणाम होईल.

मिथुन राशी भविष्य (Friday, May 18, 2018)

आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. घरातील आलिशान चैनीच्या वस्तुंसाठी अतिखर्च करू नका. तुम्हाला आज काही समस्या उद्भवतील – पण वास्तववादी राहा आणि मदत करणाºया लोकांकडून चमत्कार घडेल अशी अपेक्षा बाळगू नका. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल, तुम्ही भारावून जाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. आज तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला त्याची/तिची सुस्वभावी बाजू दाखवेल.

कर्क राशी भविष्य (Friday, May 18, 2018)

तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. आपल्या प्रियजनांना वेळ दिला नाहीत तर ते नाराज होण्याची शक्यता आहे. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. तुमच्या साहेबाला कारणे दिलेली आवडणार नाहीत – त्यामुळे साहेबाकडे तुमचे नाव राहण्यासाठी काम करत राहा. आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.

सिंह राशी भविष्य (Friday, May 18, 2018)

मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी, रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हसित व्हाल. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणे अनेक गोष्टींसाठी चांगले असेल. तुमची प्रिय व्यक्ती आज तुमच्याकडे काही वेळ मागण्याची तसेच भेटवस्तूही मागण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी लोकांशी वागताना सावध असा, हुशारी आणि संयम ध्यानात ठेवा. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील प्रियाराधन, पाठलाग, लाडीगोडी या सगळ्याच्या आठवणी जागवून तुम्ही ताजेतवाने व्हाल.

कन्या राशी भविष्य (Friday, May 18, 2018)

शारीरिक व मानसिक आजारपणामुळे विषण्णता येईल. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. घरच्या आघाडीवर अडचण संभवते त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल – म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला काहीतरी छान ट्रीट देणार आहे. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल.

तुल राशी भविष्य (Friday, May 18, 2018)

तुम्ही आहार व्यवस्थित घ्या विशेषत: अर्धशीशीच्या रुग्णांनी अन्नसेवन योग्य वेळी न केल्यास त्यांना विनाकारण भावनिक ताणाचा सामना करावा लागेल. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. राग हा केवळे काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो, पण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता, याची जाणीव ठेवा. जुजबी मतभेद झाल्याने प्रणयराधनाचा योग नाही. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वत:साठी चांगले कपडे घ्याल. आजच्या दिवशी तुमच्या क्षमता आणि कमतरता दिसून येतील. आजचा दिवस काहीसा कठीण असणार आहे.

वृश्चिक राशी भविष्य (Friday, May 18, 2018)

अंगदुखीची दाट शक्यता आहे. शारिरीक ताण घेऊन काम करणे टाळा. कारण त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येईल. पुरेशी विश्रांती घ्यायला विसरू नका. संशयास्पद आर्थिक भागीदारीला भूल नका. गुंतवणूक ही अतिशय काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. काही लोक जरूरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील – परंतु केवळ गप्पा करणाºया लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. तुमचे प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे, त्याचा सुखद अनुभव घ्या. व्यावसायिक अडचणीवर मात करण्यासाठी तुमची कौशल्ये वापरा. तुमच्या थोड्याशा प्रयत्नांमुळे समस्या कायमस्वरूपी सुटेल. दुस-या-तिस-या व्यक्तींकडून ऐकलेल्या बातम्या तपासून खात्री करून घ्या. . तुमचा/तुमची जोडीदार आज तुमची जास्त काळजी घेईल.

धनु राशी भविष्य (Friday, May 18, 2018)

भावनिकदृष्ट्या तुम्ही बेभरवशाचे आणि तुम्हाला नेमके काय हवे त्याबाबत चंचल मनोवृत्तीचे आहात. आर्थिक अडचणींमुळे टीका आणि वादविवादाची परिस्थिती उद्भवेल. आपल्याकडून अतिअपेक्षा करणा-यांना नाही म्हणायची तयारी ठेवा. आपल्या उदार वागण्याचा फायदा मित्रमैत्रणींना घेऊ देऊ नका. तुम्ही प्रेमात पोळून निघालात तरी हळूहळू प्रेम मिळविण्यात यशस्वी व्हाल. कामामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडविण्याइतके आयुष्य नक्कीच क्षुल्लक नाही, ते अमूल्य आहे. ही परिस्थिती तुमच्या संयमाची परीक्षा घेतल असेल. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता. पण आज या सगळ्या तक्रारी दूर होतील.

मकर राशी भविष्य (Friday, May 18, 2018)

आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. घरात काही घडल्याने तुम्ही खूप भावनिक व्हाल – परंतु, तुमच्या भावना संबंधित व्यक्तीपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचविण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. तुमच्या नोकरीला चिकटून राहा आणि तुम्हाला आज कुणी मदत करील अशी अपेक्षा बाळगू नका. खाजगी आणि गोपनीय माहीत कधीही उघड करू नका. रोमँटिक गाणी, सुगंधी मेणबत्त्या, रुचकर जेवण आणि थोडीशी मदिरा; तुमच्या जोडीदारासमवेत या सगळ्याचा आस्वाद घेणार आहात.

कुम्भ राशी भविष्य (Friday, May 18, 2018)

मित्राबरोबरील मतभेद तुम्हाला रागीट बनवतील. निष्कारण तणाव टाळण्यासाठी तुम्ही भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खुप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. प्रेमातील अपेक्षाभंग तुमची हिंमत तोडू शकणार नाही. कामाच्या ताणतणावांचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्याबद्दल काही अप्रिय गोष्टींचा उल्लेख करेल.

मीन राशी भविष्य (Friday, May 18, 2018)

चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुम्ही जर अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रियकर-प्रेयसीच्या अनावश्यक मागण्यांकडे लक्ष देऊ नका नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. प्रवास-करमणूक आणि लोकांमध्ये मिसळणे हाच तुमच्या आजच्या दिवसाचा विषय आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची कठीण बाजू आज कदाचित पाहायला मिळेल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top