astrology

राशिभविष्य 12 जून 2018 : आज या 4 राशींवर हनुमानजी कृपा करणार आहेत

आज मंगळवार 12 जून चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Tuesday, June 12, 2018)

स्वत:च स्वत:वर औषधोपचार करू नका, त्यामुळे औषधावर विसंबण्याची सवय वाढू शकेल. पैसे मिळविण्याचा नव्या संधी लाभदायक असतील. संततीच्या योजना करण्यासाठी उत्तम दिवस आहे. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. आपला रिझ्यूम पाठविण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.

वृषभ राशी भविष्य (Tuesday, June 12, 2018)

तुम्हाला पार्टीमध्ये न्यूनगंडाची भावना ग्रासण्याची शक्यता आहे. यावर मात करण्यासाठी सकारात्मक विचार करा. त्याशिवाय तुम्ही आत्मविश्वासाने वावरू शकणार नाही. संशयास्पद आर्थिक भागीदारीला भूल नका. गुंतवणूक ही अतिशय काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. आज तुमचे वर्चस्व असणारा दिवस नाही किंवा नवीन कामास सुरुवात करू नका, त्रास ओढवून घ्यावा लागेल. प्रणयराधनेत गुंतल्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. तुमचा प्रियकर/प्रेयसी आज तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूप छान काळ घालवाल.

मिथुन राशी भविष्य (Tuesday, June 12, 2018)

तुमचे हास्य हे नैराश्य घालविण्यासाठीचा उत्तम उपाय ठराल. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. प्रेमप्रकरण वेगळे वळण घेईल, अर्थात त्यात तुमचे भलेच होईल. कामकाजाच्या ठिकाणी होणा-या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करु नका. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे, याची आज तुम्हाला जाणीव होईल.

कर्क राशी भविष्य (Tuesday, June 12, 2018)

ज्येष्ठांनी त्यांच्या जास्तीच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून त्याचा चांगला लाभ घ्यावा. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. भूतकाळातील आनंदी क्षणांध्ये तुम्ही गुंतून जाल. आज तुमच्या कष्टाचे चीज होईल. वेगाने वाहन चालविणे टाळा. रस्त्यावरून जाताना धोका पत्करणे टाळा. तुम्ही तुमच्या जोडीदारावर आज भरपूर खर्च करणार आहात, पण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे.

सिंह राशी भविष्य (Tuesday, June 12, 2018)

विनाकारण स्वत:ची निंदा करून तुमचा उत्साह घालवू नका. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खुप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. प्रणयराधन करण्याची शक्यता नाही आणि तुम्ही दिलेली महागडी, मौल्यवान भेटवस्तू याची जादू आज फारशी चालणार नाही. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्याचा तुमच्या कामावर परिणाम होईल.

कन्या राशी भविष्य (Tuesday, June 12, 2018)

येणारा काळ हा खूप चांगला आहे, त्यासाठी उल्हसित राहा, त्यातूनच तुम्हा आधिक ऊर्जा मिळेल. मोठया योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल – त्या व्यक्तिची विश्वासनीयता तपासून पाहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. आपला काही वेळ इतरांना देण्यासाठी चांगला दिवस. आपल्या प्रियकर/प्रियसीशी सूड उगविण्याच्या भावनेने वागल्यास काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा शांत डोक्याने, आपल्या ख-या भावना नेमकेपणाने सांगणे योग्य ठरेल. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणा-यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल.

तुल राशी भविष्य (Tuesday, June 12, 2018)

मद्यपान करू नका, त्यामुळे आपली झोप बिघडू शकते आणि चांगल्या विश्रांतीपासून तुम्ही दूर जाता. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. तुम्ही इतरांच्या चुका विनाकारण दाखविल्यामुळे नातेवाईक तुमच्यावर टीका करतील. अशा प्रकारे वेळ वाया दवडला जातो याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. यातून तुम्हाला काहीच फायदा होत नाही. त्यापेक्षा तुमच्या सवयी बदला. विशुद्ध प्रेमाचा तुम्हाला अनुभव मिळणार आहे. त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा. एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केलेत तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. तुम्हाला चुकीचा मार्ग दाखविणा-या व्यक्तीवर लक्ष ठेवा किंवा चुकीची माहिती देऊन तुम्हाला हानी पोहोचविण्याची शक्यता आहे. पाऊस नेहमी रोमँटिकच असतो आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत याच रोमँटिक वातावरणाचा दिवसभर आनंद लुटाल.

वृश्चिक राशी भविष्य (Tuesday, June 12, 2018)

तुमची समस्या सोडविण्यासाठी मित्राची मदत घ्या. भूतकाळातील घटनांवर वर्तमानात विचार करून फारसा उपयोग नाही. उलट तुमची मानसिक व शारिरीक ऊर्जा उगाच फुकट जाईल. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारेल. प्रेमाची उणीव भासणारा दिवस. तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार करणे, त्याच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल. रम्य सहली समाधानकारक ठरतील. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला कळेल की, तुमचा/तुमची तुमच्यासाठीच तयारी करत होता/होती.

धनु राशी भविष्य (Tuesday, June 12, 2018)

तुम्ही आहार व्यवस्थित घ्या विशेषत: अर्धशीशीच्या रुग्णांनी अन्नसेवन योग्य वेळी न केल्यास त्यांना विनाकारण भावनिक ताणाचा सामना करावा लागेल. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. एखाद्या जुन्या मित्राच्या अचानक भेटीमुळे रम्य अशा जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. तुमच्या प्रिय व्यक्तीचा मूड अस्थिर झाल्याने आज प्रणयराधन करणे शक्य होणार नाही. तुमच्या अवतीभवतीच्या लोकांनाही लाभदायी ठरतील असे प्रकल्प अंमलात आणण्यास तुमची स्थिती अतिशय सक्षम आहे. गुप्तशत्रू तुमच्याविषयीच्या फवा पसरविण्याची शक्यता आहे. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी आज विचित्रप्रकारे वागण्याची शक्यता आहे. तुमचा संयम सोडू नका.

मकर राशी भविष्य (Tuesday, June 12, 2018)

तुमचा आजार तुमच्या दु:खाचे कारण ठरेल. लवकरात लवकर त्यावर मात करून कुटुंबात आनंद परत आणा. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. संवाद, संभाषण आणि चर्चा योग्य मार्गाने जात नसतील तर तुम्ही तुमचा शांतपणा सोडून काहीतरी बोलून बसता. अर्थात त्याबद्दल नंतर क्षमादेखील मागता, पण असे बोलण्याआधी विचार करणे श्रेयस्कर. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. कामाच्या ठिकाणची परिस्थिती काहीशी विचित्र असू शकेल; सर्वजण तुमच्या विरुद्ध आहेत, असे तुम्हाला वाटू शकेल. असे वाटत असले तरी ते खरे नाही. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरे जावे लागेल.

कुम्भ राशी भविष्य (Tuesday, June 12, 2018)

विजयोत्सव साजरा केल्याने तुम्हाला अतीव आनंद मिळेल. मित्रमंडळींसमवेत हा आनंद साजरा करा. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. तुम्ही नेहमी ज्या व्यक्तीवर भरवसा केला ती व्यक्ती तुमच्याशी प्रामाणिक नाही हे समजल्यावर तुम्ही आज प्रचंड अस्वस्थ व्हाल. प्रेमाच्या परमानंदात आज तुमची स्वप्ने आणि वास्तव एकच होतील. तुमच्या कार्यालयीन कामामध्ये आज बरेच अडथळे निर्माण होतील. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरा. सातत्याने विविध गोष्टींवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढून त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण पडेल.

मीन राशी भविष्य (Tuesday, June 12, 2018)

मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल, पण अतिखाणे आणि मद्यपान त्रासदायक ठरू शकते. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. तुमचे मित्र आणि नातेवाईक तुमच्या गरजा समजून घेणार नाहीत असे तुम्हाला आढळून येईल – म्हणून लोक तुमच्यासाठी बदल करतील अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वत:त काही बदल करण्यासाठी मनापासून प्रयत्न करा. तुमच्या प्रेमजीवनात आजच्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी खास मिळणार आहे. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहेत, असे वाटते. आपल्या प्लॅनमध्ये शेवटच्या क्षणी बदल होण्याची शक्यता असणारा दिवस. विवाहानंतर पापाचं रुपांतर पुजेत होतं आणि आज तुम्ही भरपूर पुजा करणार आहात.


Show More

Related Articles

Back to top button