inspiration

दोन भिकारी होते एक भिकारी परमेश्वरा जवळ मागत असे तर दुसरा राजाकडे, मंग कोणाची मागणी पूर्ण झाली जाणून घ्या.

एका लोककथेच्या अनुसार खूप वर्षांपूर्वी एक राजा रोज मंदिरामध्ये जात असे. मंदिराच्या बाहेर दोन भिकारी बसत होते. एक भिकारी देवाला म्हणत असे कि हे परमेश्वरा तू राजाला भरपूर दिले आहेस, मला पण दे. दुसरा भिकारी राजाला म्हणत असे हे राजन तुला ईश्वराने भरपूर दिले आहे, मला ही काही दे.

पहिला भिकारी म्हणत होता कि राजाला नाही परमेश्वराला मागितले पाहिजे, तो सगळ्यांची इच्छा पूर्ण करतो, पण दुसरा भिकारी त्याला मूर्ख समजून गप्प बसत असे.

एक दिवस राजाने विचार केला कि पहिला भिकारी परमेश्वरा जवळ मागतो, परमेश्वर त्याला देतीलच, पण दुसरा भिकारी माझ्या जवळ मागतो. मला त्याला थोडे धन दिले पाहिजे. असा विचार करून राजाने एक मोठ्या भांड्यामध्ये खीर भरली आणि त्यामध्ये सोन्याचे सिक्के टाकले. मंत्र्याला सांगितले कि दुसऱ्या भिकाऱ्याला दे.

मंत्री मंदिरात गेला आणि दुसऱ्या भिकाऱ्याला खीर भरलेले भांडे देऊन आला. भिकारी आनंदी झाला कि राजाने त्याच्यासाठी खीर पाठवली आहे. तो पहिल्या भिकाऱ्याला म्हणाला हि बघ खीर, तू मूर्ख आहेस, तुला देखील राजा जवळ मागितले पाहिजे होते. त्याने पोट भरून खीर खाल्ली आणि उरलेली खीर पहिल्या भिकाऱ्याला दिली आणि म्हणाला घे मूर्खां तू पण खा खीर. अर्धी खीर देऊन तो भिकारी तेथून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी राजा मंदिरामध्ये आला तेव्हा परमेश्वरा जवळ मागणारा भिकारी तेथे नव्हता. ज्या भिकाऱ्यासाठी राजाने खीर पाठवली होती तो भिकारी तेथेच होता. राजाने त्याला विचारले तुला काल खीर पाठवली होती मिळाली का? भिकारी म्हणाला होय महाराज खीर अत्यंत स्वादिष्ट होती. मी उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्याला दिली. राजा समजला कि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली होती आणि त्याला धन मिळाले होते.

कथेचा सार

या कथेचे सार हे आहे कि आपल्याला परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे. परमेश्वर योग्य वेळ आल्या नंतर आपल्या भक्तांची समस्या दूर करतात. उशिरा का होईना भक्तांवर परमेश्वराची कृपा नक्की होते.

आपल्याला आमचे माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी लेख आवडत असतील तर आमचे पेज लाईक करण्यास विसरू नका. तसेच वरील कथा आपणास उपयोगी वाटत असेल तर मित्रांसोबत शेयर करून त्यांना देखील कळवा. आपले अभिप्राय कमेंट्स मधून आम्हाला कळवा.


Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button