Connect with us

गर्भधारणेसाठी कोणती सेक्स पोझिशन योग्य?

Love

गर्भधारणेसाठी कोणती सेक्स पोझिशन योग्य?

बदलत्या जीवन शैलीचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही होतो. विशेषता गर्भधारणेवर याचा परिणाम अधिक होताना दिसत आहे. जास्त करून लग्न झालेल्या युवा दाम्पत्य मुलं होऊ देण्यात उशीर करतात. किंवा सध्याच्या करिअर ओरिएंटेड जगात मुलं उशीरा होऊ देण्यावर अधिक भर आहे. उशीर झाल्यावर मुलं होण्यात समस्या निर्माण होतात.

पण एखाद्या महिलेला गर्भधारणा करण्याची इच्छा आहे. घरात पाळणा हलविण्यासाठी दाम्पत्य तयार असतील तर त्यांना आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींसोबत सेक्सच्या प्रकारांवरही ध्यान देणे गरजेचे आहे. फर्टिलीटी एक्सपर्ट मेरिलीन ग्लेनविले यांच्यानुसार एखादी महिला आपल्या खानपानासोबत खास सेक्स पोझिशनचा उपयोग करत असेल तर तिची गर्भधारणेची शक्यता वाढते.

वेबसाइट मिररनुसार २० ते ३० वयोगटातील आजच्या युवा पिढीमध्ये करीअरला अधिक प्राधान्य आहे. त्यामुळे ते मुलं उशीरा होऊ देता. पण महिलांसाठी गर्भधारणेची सर्वात उपयुक्त वय २३ ते ३१ या कालावधीत आहे. त्यानंतर महिलांना गर्भधारणेत अडचणी निर्माण होऊ शकतात.

विशेषज्ञांनुसार खान-पानच्या सवयीत सुधारणा, अल्कोहोल आणि कॅफीनपासून दूर राहिल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते.

विशेष म्हणजे, डॉक्टर ग्लेनविले यांनी सांगितले की गर्भधारणेसाठी सेक्स पोझिशनही खूप महत्त्वाची आहे.

डेलि मेल ऑनलाइननुसार, ‘द मॅन ऑन टॉप’ ही पोझिशन महिलांसाठी गर्भधारणेची शक्यता वाढविणारी आहे. ग्लेनविले यांनी सांगितले की, या पोझिशनने पुरूषांचे शुक्राणू सरळ गर्भाशयात जातात, या पोझीशनने शुक्राणूंच्या लांब प्रवास सुखकर होतो.

ग्लेनविले यांच्या दाव्याची पुष्टीसाठी कोणताही वैज्ञानिक आधार नाही. गर्भधारणासंदर्भात त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ग्लेनविले यांनी म्हटले की, सेक्स पोझिशन ‘वुमन ऑन टॉप किंवा ज्या गुरूत्वाकर्षणाच्या विपरीत आहे, त्या शुक्राणूच्या प्रवासाला बाधीत करतील.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top