जेव्हा तलावातून मगरीचे पिल्लू पकडून घेऊन आले होते मोदी, Man Vs Wild मध्ये सांगितले गुपित

Man vs Wild with PM Modi Episodes:डिस्कवरी चैनल (Discovery Channel)वर सोमवार (12 ऑगस्ट) रात्री नऊ वाजता मैन वर्सेस वाइल्ड (Man Vs Wild) शो चे प्रसारण केले गेले. या शो मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत होस्ट बेयर ग्रिल्स (Bear Grylls) एका वेगळ्या अंदाजात पाहण्यास मिळाले. याचे शूटिंग फेब्रुवारी महिन्यात जिम कॉर्बेट पार्क मध्ये केले गेले. शो मध्ये पंतप्रधान मोदी यांनी आपल्या लहानपणीच्या अनेक आठवणी बेयर सोबत शेयर केल्या. गप्पागोष्टी दरम्यान मोदींनी आपल्या लहानपणीची मगरीच्या संबंधीतील एक घटना बेयरला सांगितली.

मगरी बद्दल केला प्रश्न: खरंतर शोचा होस्ट बेयर ग्रिल्स याने मोदींना मगरी बद्दल एक प्रश्न विचारला होता. यावर मोदींनी सांगितले कि लहानपणी ते दररोज तलावा मध्ये अंघोळीला जात होते. एक दिवस जेव्हा ते अंघोळ करत होते तेव्हा त्यांनी एक मगरीचे पिल्लू पाण्यात पोहत असल्याचे पाहिले आणि खेळताखेळता त्यांनी उचलून त्याला आपल्या सोबत  घरी आणले. याबद्दल जेव्हा त्यांच्या आईला समजले तेव्हा त्यांनी नरेंद्र मोदींना समजावले कि हे चुकीचे  आहे. यानंतर त्यांनी पुन्हा मगरीच्या पिल्लाला तलावात सोडून दिले.

निसर्ग आणि हिमालय बद्दल गोष्टी केल्या: पंतप्रधान मोदी यांनी शोच्या दरम्यान निसर्ग आणि हिमालय यांच्या बद्दल असलेल्या आपल्या आकर्षणा बद्दल संवाद केला. मोदी म्हणाले,

‘जर आपण निसर्गा सोबत संघर्ष केला तर हे फक्त निसर्गासाठीच नाही तर सगळ्यांसाठीच धोकादायक असते, पण जेव्हा आपण निसर्गा सोबत संबंध बनवतो तेव्हा तो देखील आपली मदत करतो.’

ते पुढे म्हणाले आपल्याला निसर्गाला घाबरले नाही पाहिजे तर त्याच्या बद्दल उत्सुक राहिले पाहिजे.

18 वर्षात पहिल्यांदा सुट्टीवर: शोच्या दरम्यान होस्ट बेयर ने मोदी यांना विचारले कि त्यांच्या मनामध्ये पंतप्रधान बनण्याचा विचार कधी आला. आपल्या आयुष्या बद्दल बोलताना मोदीजी म्हणाले कि ते 13 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर देशातील जनतेने त्यांना पंतप्रधान बनण्याची संधी दिली. तेव्हा पासून मागील पाच वर्ष ते याच कामात आहेत. ते म्हणाले कि

जर तुम्ही ही सुट्टी समजत असाल तर मागील 18 वर्षातली ही माझी पहिली सुट्टी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here