astrologyPeoplerelationship

या 5 लोकांशी कधीही करू नये मैत्री, अन्यथा करावे लागेल पश्चाताप

लहानपणापासूनच आपल्याला सर्वांसोबाबत मिळून-मिसळून राहण्याची शिकवण दिली जाते, परंतु काही लोकांपासून आपण नेहमी दूरच राहावे. महाभारतातील शांती पर्वामध्ये भीष्म पितामह यांनी युधिष्ठिरला या विषयी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी आजही आपल्या जीवनासाठी खूप उपयोगी आहेत. मनुष्याने कोणत्या प्रकारच्या लोकांसोबत मैत्री करावी आणि कोणापासून दूर राहावे याविषयी भीष्म यांनी राजा युधिष्ठिरला ज्ञान दिले.

नास्तिक

जो व्यक्तीला धर्म, ज्ञान आणि देवाबद्दल काहीच वाटत नाही तो धर्म आणि शास्त्रावर विश्वास नसल्यामुळे अधर्मी आणि पापी बनतो. खोटं बोलणे, वाईट वागणे हा त्याचा स्वभाव होऊन जातो. तो स्वतःचे आयुष्य नरका प्रमाणे करून घेतोच त्याच बरोबर त्याच्या सहवासात असलेल्या सर्वांना स्वतः प्रमाणे बनवतो. अशा लोकांच्या पासून नेहमी दूरच राहावे.

क्रोध करणारा व्यक्ती

अधिक क्रोध करणारा व्यक्ती दानवा प्रमाणे मानला जातो. क्रोध केल्याने मनुष्याचे नुकसान होते. क्रोध केल्यामुळे मनुष्य नेहमी निंदा आणि हास्याला पात्र ठरतो. अश्या याक्ती सोबत मैत्री केल्यामुळे फक्त आपल्याला स्वतःलाच नाही तर आपल्या जवळच्या व्यक्तींना हानी होते. यामुळे क्रोधी व्यक्ती पासून दूरच राहावे.

मनात द्वेषभावना ठेवणारा व्यक्ती

जो व्यक्ती इतरांच्या बद्दल स्वतःच्या मनात द्वेषभाव ठेवतो, तो निश्चितच छळ आणि कपट करणारा, पापी, धोका देणारा असतो. हे लोक इतरांना कमीपणा दाखवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. मनात द्वेषभाव असणाऱ्या व्यक्तीला चांगल्या वाईट गोष्टींशी काहीही देणेघेणे नसते. अशा लोकांची मैत्री आपल्याला धोकादायक ठरू शकते.

व्यसनी

सर्वासाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. या नियमांचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे, परंतु व्यसन करणारा व्यक्ती कोणत्याच नियमाचा विचार करत नाही. दारू प्यायल्यानंतर त्याला चांगल्या-वाईट गोष्टीमधील फरक कळत नाही. असे लोक कुटुंबाला आणि इतरांना त्रासदायक ठरतात. कोणत्याही क्षणी ते संकट निर्माण करू शकतात. त्यामुळे अशा लोकांची मैत्री न केलेली बरी.

आळशी

आळस माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आळशी व्यक्ती जीवनात कोणत्याही संधीचा लाभ घेऊ शकत नाहीत. आळसामुळे व्यक्ती स्वतः च्या जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाही आणि सर्वांच्या नजरेत वाईट बनतो. या लोकांच्या संगतीमध्ये आपणही आळशी होऊ शकतो. यामुळे अशा लोकांसोबत मैत्री करू नये.


Show More

Related Articles

Back to top button