काश्मीर मधली सोनेरी सकाळ

काश्मीरला असलेला विशेषाधिकार रद्द करण्यात आलेला आहे म्हणजेच अनुच्छेद 370 रद्द करण्यात आलेला आहे त्यानंतर काश्मीर मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आता परिस्थिती हळूहळू सुधारत आहे आणि काल येथील संचारबंदी देखील उठवण्यात आली. ज्यानंतर येथील लोक सामान्यपणे आपली दैनंदिन कामे करताना दिसली. खालील फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता एक लहानगा सीआरपीएफ जवानाच्या सोबत संवाद करत आहे. मागील काही तणावातील वातावरणा नंतर हे चित्र आशेचा किरण मानला जात आहे.

370 अनुच्छेद हे कमल रद्द केल्या नंतर काश्मीर मध्ये संचारबंदी लागू केली होती. पण शुक्रवारी नमाजासाठी हे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. याकाळात काश्मीर मधील वातावरण नव्या पर्वाची चाहूल देणारे होते.

संचारबंदी शिथिल केल्याच्या काळात काश्मीर मधील परिस्थिती नॉर्मल होती. ज्यामुळे शनिवार पासून संचारबंदी मागे घेण्यात आली.

आता काश्मीर खोऱ्यातील सगळ्या शाळा आणि कॉलेज पूर्ववत सुरु झाली आहेत.

शनिवारी संचारबंदी मागे घेतल्या नंतर लोकांनी आपल्या सामान्य दैनंदिन जीवनकार्यास सुरुवात केली.

तर अनेक दिवसा नंतर पुन्हा काश्मीर मधील रस्ते लोकांनी गजबजलेले दिसले.

तर एक निरागस लहान मुलगा सीआरपीएफ महिला कर्मचाऱ्या सोबत हस्तांदोलन करत असल्याचे दिसले.

लहान मुलगा आणि सीआरपीएफचे जवान यांच्यातील हे मैत्रीपूर्ण नाते पाहून सगळ्यांनाच आनंद होईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here