Connect with us

यमराजाच्या अनोख्या मंदिरात आहेत 4 अदृश्य दरवाजे, जेथून आत्मा जाते स्वर्ग किंवा नरक

Astrology

यमराजाच्या अनोख्या मंदिरात आहेत 4 अदृश्य दरवाजे, जेथून आत्मा जाते स्वर्ग किंवा नरक

यमराज यांना मृत्युदेवता मानले जाते. यमराज यांचे एक अनोखे मंदिर हिमाचल मधील चम्बा जिल्ह्यातील भरमौर नावाच्या ठिकाणी आहे. हे मंदिर एक वास्तू स्वरूपात आहे. येथे प्रचलित असलेल्या मान्यते अनुसार मनुष्याच्या कर्माचे चित्रगुप्त ध्यान ठेवतात. मृत्यू नंतर यमदूत मनुष्य आत्मा घेऊन याच मंदिरात येतात. यानंतर मानव जन्मात केलेल्या पाप-पुण्याच्या आधारावर यमराज आत्मा स्वर्ग किंवा नरकामध्ये पाठवतात.

रिकाम्या खोली मध्ये विराजमान आहेत यमराज

या जागे बद्दल मान्यता आहे कि येथेच यमराज व्यक्तीच्या कर्मांचा निवाडा करतात. हे मंदिर दिसण्यास एखाद्या घरा सारखे दिसते. जेथे एक रिकामी खोली (रूम) आहे.

मान्यता आहे कि याच रिकाम्या खोली मध्ये यमराज विराजमान आहेत. येथे अजून एक खोली आहे ज्यास चित्रगुप्त कक्ष मानले जाते.

येथे यमराज सांगतात निर्णय

मान्यते अनुसार जेव्हा कोणत्याही प्राण्याची मृत्यू होते तेव्हा यमराजाचे दूत त्या व्यक्तीच्या आत्म्यास पकडून सर्वात पहिले या मंदिरा मध्ये चित्रगुप्त समोर हजर करतात.

चित्रगुप्त जीवात्म्यास त्याच्या कर्मांचा लेखाजोखा सुनावतात. यानंतर चित्रगुप्तच्या समोरील कक्षात आत्म्यास घेऊन जातात. जेथे यमराज आपला निर्णय सांगतात. येथे यमराज कर्माच्या अनुसार आत्मास आपला निर्णय कळवतात.

मंदिरात आहेत चार अदृश्य दरवाजे

मानले जात कि मंदिराला चार अदृश्य द्वार आहेत जे स्वर्ण, रजत, तांबा आणि लोखंड यांचे आहेत. यमराजाच्या निर्णया नंतर यमदूत आत्म्याला कर्माच्या अनुसार याच द्वारातून स्वर्ग किंवा नरकामध्ये पाठवतात.

गरुड पुराणा मध्ये देखील यमराजाच्या दरबारामध्ये चार द्वार असल्याचा उल्लेख आहे. कर्माच्या आधारावर या दरवाजा मधून आत्मा स्वर्ग किंवा नरका मध्ये पाठवली जाते.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top