People

आणि महिलेने सांगितले कमी वेळात एवढे सगळे मुले जन्मा येण्या मागील गुपित

युगांडा मधील एका गावात राहणाऱ्या महिलेला काही काळ लोक मुलांना जन्म देणारी मशीन म्हणून ओळखत होते. यामागील कारण होते कि महिलेने लग्ना नंतर पुढील 23 वर्षात 44 मुलांना जन्म दिला. सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे कि तिच्या सोबत असे एका खास आजारामुळे होत होते, ज्यामुळे ती प्रेग्नन्सी नंतर बहुतेक वेळा एका पेक्षा जास्त मुलांना जन्म देत होती. महिले ने 13 वेळा डिलीवरी मध्ये एका पेक्षा जास्त मुलांना जन्म दिला. यादरम्यान तिने 36 मुलांना जन्म दिला. ज्यामध्ये जुळ्या मुलांच्या सोबत एकावेळी 4 मुलांना जन्म देणे देखील समाविष्ट आहे. परंतु नंतर महिलेने आपले गर्भाशय काढून घेतले. महिलेचा पती अनेक वर्षा पासून तिच्या सोबत राहत नाही, त्यामुळे मुलांची सर्व जबाबदारी तिच्यावरच आहे.

13 वेळा दिला एका पेक्षा जास्त मुलांना जन्म

ही स्टोरी युगांडा मधील मुकुनो जिल्ह्यातील कम्पाला गावातील राहणाऱ्या 39 वर्षाची महिला मरियम नबातांजी बद्दल आहे, जी 44 मुलांची आई झाली आहे. परंतु यापैकी 6 मुलांचा मृत्यू झाल्यामुळे तिचे 38 मुले जिवंत आहेत. यापैकी 10 मुली आणि बाकीचे मुलगे आहेत.

एका खास आजारामुळे महिलेला एका वेळी एका पेक्षा जास्त मुलांना जन्म देत होती. या मेडिकल कंडीशनला ‘हाइपर ओव्युलेशन’ (जास्त अंडोत्सर्ग) बोलले जाते. ज्यामध्ये मासिकपाळी दरम्यान महिलेच्या गर्भा मध्ये एका पेक्षा जास्त अंडे रिलीज होतात. डॉक्टर्स अनुसार ही प्रोसेस जेनेटिक असते.

लग्ना नंतर पुढील 23 वर्षात महिला सहा वेळा जुळे, चार वेळा ट्रिपलेट्स (एकावेळी तीन), तीन वेळा क्वाड्राप्लेट्स (एकवेळी चार) मुलांची आई बनली. म्हणजेच 36 मुलांचा जन्म तर तिने 13 वेळच्या प्रेग्नन्सी मध्येच दिला, बाकी आठ वेळा तिने सिंगल मुलांना जन्म दिला होता.

23 च्या वयात बनली होती 25 मुलांची आई

वर्ष 1993 मध्ये मरियम जेव्हा 12 वर्षाची होती, तेव्हा तिचे लग्न 40 वर्षाच्या व्यक्ती सोबत झाले होते. जो पहिल्या पासूनच विवाहित होता आणि अनेक मुलांचा बाप होता. आपल्या लग्ना बद्दल मरियमचे म्हणणे आहे कि ‘त्यावेळेस मी अगदीच लहान होती आणि मला याबद्दल काहीच माहित नव्हते.’

लग्नाच्या एक वर्षानंतर म्हणजेच 1994 मध्ये 13 वर्षाच्या वयात मरियम पहिल्यांदा आई बनली. तिने जुळ्या बाळांना जन्म दिला आणि याच सोबत सुरु झाली अनेक मुलांना जन्म देण्याची. दोन वर्षाने महिलेने एकावेळी तीन बाळांना जन्म दिला. याच्या दीड वर्षानंतर महिलेने एकावेळी चार बाळांना जन्म दिला.

23 वर्षाचे वय होता होता महिला 25 मुलांची आई झाली होती. महिलेने डिसेंबर 2016 मध्ये आपल्या शेवटच्या मुलाला जन्म दिला. या नंतर सतत कमजोर होत असलेल्या शरीराकडे पाहून तिने डॉक्टरांना अजून मुले जन्माला येऊ नयेत याबद्दल सांगितले. ज्यानंतर डॉक्टरांनी तिचे गर्भाशय काढून तिला या त्रासा पासून सुटका मिळवून दिली.

एकटीच मुलांचे पालनपोषण करते महिला

महिलेचे म्हणणे आहे कि एकावेळी अनेक मुलांना जन्म देणे तिच्यासाठी कधीही त्रासदायक नाही राहिले. माझ्या वडिलांनी वेगवेगळ्या महिलांकडून 45 मुलांना जन्म दिला होता. हे सगळे पाच, चार, तीन आणि दोन च्या सेट मध्ये जन्माला आले होते.

मरियम आपल्या सगळ्या मुलांचे पालनपोषण स्वताच करते. तिच्या अनुसार तिचा पती तिच्यावर भरपूर अत्याचार करत होता आणि काही वर्षा पूर्वी तिला सोडून निघून गेला. तेव्हा पासून ती स्वताच सगळ्या मुलांची देखभाल करते. महिलेचे म्हणणे आहे कि जेव्हा पण तिचा पती परत येतो, तो रात्री येतो आणि सकाळी निघून जातो.

महिलेच्या मोठ्या मुलाला आपल्या वडिलांचा चेहरा माहित आहे, पण बहुतेक मुलांना तर त्यांच्या वडिलांचा चेहरा आठवत देखील नाही. कारण तो रात्री येऊन सकाळ होताच निघून जातो. आर्थिक समस्येमुळे महिलेला आपल्या मुलांचे पालनपोषण करण्यात समस्यांचा सामना करावा लागत आहे.


Tags
Show More

Related Articles

Back to top button