dharmik

रस्त्यावर पैसे मिळण्याचा काय अर्थ असतो? रस्त्यावर पडलेले पैसे उचलावे का नाही? जाणून घ्या

तुम्हाला कधी रस्त्याने जातांना पैसे मिळाले आहेत का? अनेक लोक असे असतील ज्यांना कधी ना कधी रस्त्याने जात असताना पैसे मिळाले असतील. बहुतेक वेळा लोकांना जेव्हा पैसे रस्त्याने जातांना मिळाले तर ते पैसे लोक गरिबांना दान करतात किंवा कामगारांना देतात. अत्यंत कमी लोक असतात जे असे मिळालेले पैसे आपल्या जवळ ठेवतात. पण तुम्हाला माहित आहे का कि जमिनीवर मिळालेला पैसा काही वेगळेच सांगतो. याचा सरळ संबंध आध्यात्मिकते सोबत आहे. खरतर रस्त्यावर पडलेले पैसे उचलले नाही पाहिजेत आणि जर चुकून उचलले तरी त्यांना आपल्या जवळ ठेवले नाही पाहिजेत. असे यासाठी कारण ज्याचे पैसे पडले आहेत तो कोणत्या परिस्थिती मधून जात आहे.

जमिनीवर पडलेले पैसे उचलले तर ज्या व्यक्तीचे हे पैसे आहेत त्याची उर्जा तुमच्यात येईल. ही उर्जा सकारात्मक किंवा नकारात्मक देखील असू शकते. जर व्यक्ती आनंदी आहे आणि त्याचे दिवस चांगले चालले आहेत तर त्याची सकारात्मक उर्जा पैस्यांच्या द्वारे तुमच्यात प्रवेश करेल. पण जर तो व्यक्ती दुखी आहे आणि त्याचे दिवस वाईट आहेत तर त्याची नकारात्मक उर्जा तुमच्याकडे येईल. त्यामुळे रस्त्यावर पडलेले पैसे उचलले नाही पाहिजेत आणि जर चुकून उचललेल तर त्यांना आपल्या जवळ नाही ठेवले पाहिजेत.

उर्जेचे हे आदानप्रदान पुढे देखील सुरु असते. जर आपण रस्त्यावर पडलेले पैसे उचलले तर ज्या व्यक्तीचे हे पैसे आहेत त्याची उर्जा आपल्यात येते आणि सोबतच आपण ते पैसे पुढे ज्यास देतो त्याच्यामध्ये आपली उर्जा जाते. ही साखळी अशीच पुढे जात राहते. पण जर रस्त्यावर आपल्याला सिक्का पडलेला मिळाला तर हे शुभ संकेत मानले जाते. खरतर अस बोलले जाते कि रस्त्यावर सिक्का मिळणे नवीन सुरुवातीकडे इशारा करते. याचा अर्थ जर आपण एखाद्या नवीन योजनेची सुरुवात करू इच्छित असाल तर ती यशस्वी होण्यासाठी सगळ्यात उत्तम वेळ आहे. रस्त्यावर मिळालेल्या सिक्क्याचा संबंध प्रगती आणि उपलब्धी सोबत आहे. तुम्ही यास एक शुभ संकेत मानू शकता. याच्या विरुध्द रस्त्यावर नोट मिळणे अशुभ संकेत मानला जातो.

रस्त्यावर मिळालेला सिक्का प्रगतीकडे इशारा करतो तर रस्त्यावर मिळालेली नोट आपल्या येणाऱ्या वेळेत सावध राहण्यासाठी संकेत करतो. जर आपल्याला रस्त्यावर नोट पडलेली मिळाली तर समजावे कि आपण आपल्या परस्थितीकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. हा इशारा आहे कि आपण आपल्या कामामध्ये निष्काळजीपणा करत आहोत आणि असेच चालत राहिले तर आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे जेव्हापण आपल्याला रस्त्यावर नोट पडलेली दिसली तर आनंदी होण्या एवजी सावध होण्याची गरज आहे आणि परस्थिती गंभीरतेने घेण्याची गरज आहे.

Tags

Related Articles

Back to top button