money

मोबाइल नंबरच्या पोर्टेबिलिटीची सोय बंद होणार?

मोबाईल नेटवर्क मधली प्राईज वॉर वाढत आहे. आपल्याला चांगल्या ऑफर्स, अनलिमिटेड कॉलिंग आणि डाटा स्वस्तात मिळत आहे त्यामुळे अनेक लोक मोबाईल नंबर एका कंपनीतून दुसरीकडे पोर्ट करतात. परंतु मोबाईल नंबर पोर्टबिलिटीची  सोय बंद करण्यात आली आहे. मार्च २०१९ पासून ग्राहकांना आपला मोबाईल नंबर पोर्ट करता येणार नाही.

ही सेवा का बंद होत आहे?

आघाडीचे वर्तमानपत्र इकोनॉमिक टाईम्सच्या माहिती अनुसार मोबाईल नंबर पोर्टबिलिटीचे काम करणारी कंपनी एमएनपी इंटरकनेक्शन टेलीकॉम सोल्युशन आणि सिनिवर्स टेक्नोलॉजी घाट्या मध्ये आहे. जानेवारी महिन्यापासून नंबर पोर्टिंग फीमध्येही 80%  कपात झाल्याने त्यांना सतत तोटा होत आहे. त्यामुळे मार्च २०१९ मध्ये यांचे लायसन्स संपत असल्याने ते ही सेवा बंद करणार आहेत.

सामान्य ग्राहकांचे नुकसान

नंबर पोर्टबिलिटीची सोय बंद झाल्याने ग्राहकांनाच त्याचे नुकसान होणार आहे. कॉलिंग़ रेट, टेरिफ रेट याबाबत ग्राहकांच्या सतत समस्या असतात. यावर सर्व्हिस प्रोव्हायडर बदलणं हा सर्वात सोपा उपाय होता. पण सर्व्हिस कंपन्यांनी त्यांचं लायसन्स रिन्यू न झाल्यास त्याएवजी नवीन पर्याय शोधावा लागणार आहे. त्याद्वारा मोबाईल नंबर पोर्टबिलिटीची सुविधा पुढेही लागू केली जाऊ शकते.


Show More

Related Articles

Back to top button